28 February 2021

News Flash

रणवीरची जाहिरात ७५ कोटींची!

रणवीरची ‘चिंग सिक्रेट’ची रोहित शेट्टी दिग्दर्शित नवी कोरी जाहिरात लोकांचे लक्ष वेधून घेते आहे.

रणवीर सिंग सध्या जिथे हात घालीन तिथे सोने काढीन.. अशा परिस्थितीत आहे. भन्साळींच्या ‘पद्मावती’साठी पटकथा मागितली म्हणून त्याला चित्रपटातून बाहेर काढल्याच्या कितीही चर्चा रंगल्या असल्या तरी तो मात्र अल्लादीन खिलजीच्या भूमिकेची तयारी करतो आहे. त्याचा कायम सळसळता उत्साह आणि हरहुन्नरीपणा याच्या जोरावर तो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे आणि त्याचाच फायदा त्याच्या चित्रपटांना किंवा तो ज्या ब्रॅण्ड्सचे प्रतिनिधित्व करतो त्यांना होतो आहे. रणवीरची ‘चिंग सिक्रेट’ची रोहित शेट्टी दिग्दर्शित नवी कोरी जाहिरात लोकांचे लक्ष वेधून घेते आहे. रणवीरने जाहिरात केल्यामुळे की काय ‘चिंग्ज’ची विक्री वाढू लागल्याने कंपनीने त्याच्यासोबत आता आणखी महागडी जाहिरात करण्याचा निर्णय घेतला. ‘मॅड मॅक्स फ्युरी रोड’ या हॉलीवूडपटाच्या धर्तीवर बनवलेल्या जाहिरातीसाठी कंपनीने ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत. बॉलीवूडच्या एका चित्रपटाइतके बजेट असलेली ही जाहिरात एखाद्या चित्रपटासारखीच रंजक असावी म्हणून दिग्दर्शनाची जबाबदारी रोहित शेट्टीवर टाकण्यात आली. त्यानुसार ही साडेपाच मिनिटांची जाहिरात आता तयार झाली असून ती १९ ऑगस्टपासून ऑनलाइन दाखवण्यासही सुरुवात झाली आहे. येत्या २८ ऑगस्टपासून ती टीव्ही प्रेक्षकांनाही पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2016 1:24 am

Web Title: ranvir singh advertisement for 75 crore
Next Stories
1 दीपिकाचीही कोटी कोटी उड्डाणे
2 सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार हे दमदार सिनेमे
3 ‘अंगुरी भाभी’चे ऋषी कपूर आणि वीर दास बरोबर आयटम साँग
Just Now!
X