25 February 2021

News Flash

‘आजारपणात घेतोय माझी काळजी’; बॉयफ्रेंड आदित्यसाठी रसिका सुनीलची खास पोस्ट

रसिका सध्या लॉस एंजिलिसमध्ये असून तिथेच ती आदित्य बिलागी या तरुणाला डेट करतेय.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनीलने तिच्या खासगी आयुष्याबाबत काही दिवसांपूर्वीच खुलासा केला होता. रसिका सध्या लॉस एंजिलिसमध्ये असून तिथेच ती आदित्य बिलागी या तरुणाला डेट करतेय. सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे फोटो पोस्ट करत तिने तिच्या रिलेशनशिप स्टेटसची माहिती दिली होती. आता नुकतंच तिने इन्स्टा स्टोरीवर आदित्यसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

रसिका गेल्या काही दिवसांपासून आजारी असून या आजारपणात आदित्य तिची योग्य ती काळजी घेत असल्याचं तिने सांगितलंय. ‘मी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे आणि आदित्य माझी खूप चांगल्याप्रकारे काळजी घेतोय. जेवण असो किंवा औषधं सर्वकाही तो मला जागीच आणून देतोय आणि संपूर्ण घराची काळजी घेतोय. खरंतर त्याच्यामुळे मला अजिबात घराची आठवण येत नाही. कारण मी घरी असल्यासारखंच तो सर्व गोष्टींची काळजी घेतोय. मी आता बरी आहे’, असं लिहित तिने आदित्यचे आभार मानले. रसिकाने या पोस्टद्वारे आदित्यविषयीचं प्रेमसुद्धा व्यक्त केलं.

याआधी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत रसिका म्हणाली, “होय, मी आदित्य बिलागीला डेट करतेय. आम्ही दोघंही सध्या लॉस एंजिलिसमध्ये आहोत आणि एकमेकांसोबत वेळ घालवत आहोत. मी खूप आनंदी आहे.” ‘दो हजार एक किस.. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. २०२० या वर्षभरात अनेक वाईट घडामोडी घडल्या असल्या तरी कृतज्ञ राहण्यासाठी या वर्षाने अनेक कारणं दिली आहेत’, असं कॅप्शन देत तिने आदित्यसोबतचे फोटो पोस्ट केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 4:54 pm

Web Title: rasika sunil is overwhelmed by beau aditya bilagi care and affection ssv 92
Next Stories
1 पोपटलालने केलं लग्न? नववधूच्या स्वागतासाठी गोकुळधामवासी सज्ज
2 मिताली-सुयशच्या प्रेमाला बहर; काय आहे त्यांचं ‘हॅशटॅग प्रेम’?
3 वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शवणारा ‘कानभट’
Just Now!
X