गूढ, थरारपूर्ण अशी ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे. त्यापैकीच एक भूमिका म्हणजे वच्छी. अभिनेत्री संजीवनी पाटील ही भूमिका साकारत आहे. वच्छीच्या व्यक्तिरेखेसोबतच तिचा डान्सदेखील तितकाच लोकप्रिय आहे. स्वत:च्या मुलाच्या, काशीच्या वरातीत वच्छीचा डान्स सर्व प्रेक्षकांनी पाहिला आणि सगळ्यांना आवडला देखील.

वच्छी या भूमिकेला आणि तिच्या अफलातून डान्सला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला आहे. सोशल मीडियावर डान्सवरून बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले. पण या डान्समागणी पार्श्वभूमी कोणालाच माहीत नाही. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत संजीवनी पाटील यांनी वच्छीच्या खास डान्समागची कहाणी सांगितली.

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
Kangana Ranaut Buys Mercedes
निवडणूकीपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने खरेदी केली महागडी लक्झरी कार; किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

पाहा मुलाखत-

 

कोणत्याही कोरिओग्राफरशिवाय केलेला वरातीतला हा डान्स तुफान हीट ठरला. मालिकेत येत्या काही दिवसांत वच्छीच्या भूमिकेला महत्त्वाचं वळण येणार आहे. कथानकातील हे वळण नेमकं काय असेल हे पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.