‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील शेवंता या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्ध झालेली अपुर्वा नेमळेकर सध्या सोशल मीडियावर तिने आयोजित केलेल्या चिकन पार्टीमुळे चर्चेत आहे. चित्रिकरणाच्या निमित्ताने मालिकेत काम करणारे कलाकार महिनोंमहिने आपल्या घरापासून दूर राहतात. त्यामुळे अनेकदा त्यांना घरच्या जेवणाची आठवण येते. असाच काहीसा प्रकार ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेतील कलाकारांच्या बाबतीतही घडत आहे. दरम्यान घरचे जेवण मिस करणाऱ्या कलाकारांसाठी शेवंताने चिकन पार्टीचे आयोजन केले होते.
तिने जेवण करताना काढलेला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने या चिकन पार्टीची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. शेवंताने शेअर केलेल्या या चिकन पार्टीची सोशल मीडियावर चर्चा आहे. प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक संजय जाधव आणि उमेश जाधव यांना विशेष पाहूणे म्हणून या पार्टीत निमंत्रीत केले होते.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेतील रंजकता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या या मालिकेचे कथानक अण्णा नाईक व शेवंता यांच्या प्रेमसंबंधाभोवती फिरत आहे.