गूढ कथानक व मालवणी भाषेमुळे रात्रीस खेळ चाले – २ ही मालिका प्रेक्षकांमध्ये खुपच लोकप्रिय झाली आहे. प्रेक्षकांना वारंवार आश्चर्यचकित करणाऱ्या या मालिकेतील कथानकाने आता नवीन वळण घेतले आहे. आतापर्यंत अण्णांवर प्रेम करणारी शेवंता आता त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे.

शेवंतला आण्णांसोबत असलेले नाते नको झाले आहे. त्यासाठी ती अथक प्रयत्न करत आहे. शेवंता अण्णांनी घरी येऊ नये म्हणून तिच्या नवऱ्याला म्हणजे पाटणकरांना कामाला जाताना घराला कुलूप लावायला सांगते. शेवंताचे बोलणे ऐकून पाटणकरांना देखील आश्चर्य वाटते. शेवटी शेवंताच्या हट्टा खातर पाटणकर घराला कुलूप लावतात.

अण्णा तुरुंगातून सुटून शेवंताला भेटण्यासाठी जातात. परंतु शेवंताच्या घराला कुलूप पाहून ती कुढे गेली असावी? असा प्रश्न अण्णांना पडतो. अण्णा दार वाजवत असताना. हे सर्व शेवंता आतुन वाकून बघते. परंतु ती घाबरते आणि कोणतेच प्रत्युतर देत नाही. अण्णा कंटाळून घरी परततात. रस्त्यात त्यांना योगायोगाने पाटणकर भेटतात. पाटणकर अण्णांना  शेवंताच्या विचित्र वागण्याबद्दल सागंतात. अगदी  शेवंताच्या सांगण्यावरुन घराला कुलूप लावून घराची चावी शोभाकडे दिल्याचेही सांगतात. पाटणकरांचे बोलणे ऐकून अण्णांना शेवंताचा राग येतो.

अण्णा घरी जातात. वच्छीच्या सूनेकडून शेवंताच्या घराची घेतात आणि रागारागात शेवंताला भेटण्यासाठी जातात. आता अण्णा आणि शेवंताला पाटणकर एकत्र पकडणार का? शेवंता आणि अण्णांमध्ये असलेल्या नात्याला पूर्णविराम लागणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे.