27 November 2020

News Flash

‘चला हवा येऊ द्या’मध्ये रविना टंडन

या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हजेरी लावली.

‘मातृ’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हजेरी लावली.

आपल्या अभिनयाने आणि नृत्याच्या अदाकारीने चित्रपट रसिकांची मने जिंकणारी बॉलिवडची ‘मस्त गर्ल’ अशी ओळख असणारी अभिनेत्री रविना टंडन आता हिंदी चित्रपटात पदार्पण करते आहे. तिचा ‘मातृ’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हजेरी लावली. येत्या मंगळवारी १८ एप्रिलला रात्री ९.३० वाजता हा भाग प्रसारित होणार आहे. तर सोमवारच्या भागात ‘झी मराठी’वरील लोकप्रिय  ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या मालिकेतील कलाकार सहभागी होणार आहेत.

‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर आजवर अनेक नामी बॉलिवुड मंडळींनी हजेरी लावली आणि याच मंचावर आता रविनासुद्धा येणार आहे. अतिशय संवेदनशील अशा विषयावर आधारित ‘मातृ’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रविनाने थुकरटवाडीची वाट धरली यावेळी तिच्यासोबत या चित्रपटात काम केलेली मराठमोळी अभिनेत्री दिव्या जगदाळेसुद्धा उपस्थित होती. यावेळी रविनासोबत थुकरटवाडीच्या मंडळींनी एकच धम्माल उडवून दिली आणि या सर्वाला तिने खळखळून दादही दिली. कुशल बद्रिके आणि भाऊ कदमसह काही गाण्यांवर तिने नृत्याचा ठेकाही धरला. तर पोस्टमन काका बनून आलेल्या सागर कारंडेच्या पत्राने तिच्या डोळ्याच्या कडाही ओल्या झाल्या. एकंदरीत धम्माल मजा मस्तीसोबतच एका संवेदनशील विषयावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

सोमवारच्या भागात ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ची टीम ‘चला हवा येऊ द्या’च्या सोमवारच्या भागात ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ मालिकेची टीम हजर राहणार आहे. ज्यात दिलीप प्रभावळकर, नयना आपटे, सुकन्या कुलकर्णी मोने, प्रियदर्शन जाधव, सायली फाटक मालिकेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी, निर्माती मनवा नाईक आणि दिग्दर्शक स्वप्ननील जयकर आदींचा समावेश आहे. या अतरंगी कलाकारांबरोबर थुकरटवाडीच्या मंडळींनी केलेली धम्मालही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 2:33 am

Web Title: raveena tandon on the set of chala hawa yeu dya
Next Stories
1 ।। मेघदूत।। : अप्रतिम दृक्-श्राव्य-काव्य!
2 ..अशीही ठेकेदारी
3 संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट; निर्मात्याला धमकावल्याचा आरोप
Just Now!
X