News Flash

कराची स्टॉक एक्सेंजवरील हल्ल्यावर रविना टंडनची प्रतिक्रिया; ट्विट करत म्हणाली…

कराची स्टॉक एक्सेंजवरील दहशतवादी हल्ल्याविषयी रविना टंडन म्हणते....

पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्सेंजवर सोमवारी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक पोलीस उप- निरीक्षक आणि चार सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सर्व स्तरांमधून चर्चा होत असताना अभिनेत्री रविना टंडनने ट्विटरच्या माध्यमातून तिचं मत व्यक्त केलं आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

“कराचीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना खरंच फार दु:खद आहे. या हल्ल्यात नाहक बळी गेलेल्या काही निष्पाप नागरिकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली”, असं ट्विट रविनाने केलं आहे.


दरम्यान, कराचीमध्ये पाकिस्तानी स्टॉक एक्सेंजचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भारताचाही समावेश आहे. अनेक सेलिब्रिटींनी या प्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची मत व्यक्त केली आहे.तसंच रविानेदेखील केलं आहे. रविना बऱ्याच वेळा समाजात घडणाऱ्या घटनांवर उघडपणे व्यक्त होत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 1:16 pm

Web Title: raveena tandon twitter reaction on terrorist attack in karachi ssj 93
Next Stories
1 आमिर खानच्या स्टाफला करोनाची लागण, आईची चाचणी बाकी
2 Laxmmi Bomb: कुठलाही संप्रदाय दुखावणार नाही याची काळजी घेतलीय- अक्षय कुमार
3 “देश वाचवल्याबद्दल आभार, टिकटॉक नावाच्या व्हायरसला पुन्हा परवानगी देऊ नका”
Just Now!
X