05 March 2021

News Flash

रवी किशनच्या मुलीचं पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलासोबत बॉलिवूड पदार्पण

'सब कुशल मंगल' या चित्रपटातून रिवा आणि प्रियांक पदार्पण करत आहेत.

रिवा, प्रियांक

जान्हवी कपूर, सारा अली खान यांसारख्या स्टारकिड्सनी नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. येत्या काळात इतरही बरेच स्टारकिड्स आहेत जे बॉलिवूडची वाट धरणार आहेत. या यादीत आता आणखी दोन नावांची भर पडली आहे. भोजपुरी सुपरस्टार रवी किशन यांची मुलगी रिवा आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचा मुलगा प्रियांक बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत.

करण कश्यप दिग्दर्शित आगामी ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातून रिवा आणि प्रियांक पदार्पण करत आहेत. विशेष म्हणजे दिग्दर्शक म्हणून करण कश्यपचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर नितीन मनमोहन यांनी कन्या प्राची या चित्रपटाची निर्माती आहे. यामध्ये अक्षय खन्ना महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

वाचा : ‘मोदी साहब सॉरी’; त्या ट्विटप्रकरणी दोन वर्षांनंतर कपिल शर्माने मागितली जाहीर माफी

या चित्रपटाची कथा झारखंडच्या पार्श्वभूमी असल्याचं कळतंय. फेब्रुवारीच्या अखेरीस शूटिंगला सुरुवात होणार असून झारखंडमध्ये ४५ दिवस शूटिंग पार पडणार आहे. आता हे स्टारकिड्स सारा, जान्हवी, इशानला टक्कर देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 1:25 pm

Web Title: ravi kishan daughter riva and padmini kolhapure son priyaank debut movie sab kushal mangal
Next Stories
1 आता तरी तिला एकटं सोडा; कंगनाच्या मदतीला पुन्हा धावून आली बहीण
2 कलाकारांच्या क्रिकेट लीगनं ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमचं शानदार उद्घाटन
3 ‘मोदी साहब सॉरी’; त्या ट्विटप्रकरणी दोन वर्षांनंतर कपिल शर्माने मागितली जाहीर माफी
Just Now!
X