20 September 2019

News Flash

‘त्या’ सुपरस्टारच्या ‘वन नाईट स्टॅण्ड ऑफर’ला नकार दिल्याचा अजूनही पश्चाताप

आणि मी माझ्या हातातील संधी सोडून दिली

हॉलीवूड अभिनेता लिओनार्दो दी कॅप्रिओ तिथे जेवढा प्रसिद्ध आहे तेवढीच त्याची चर्चा भारतातही आहे. त्यामुळे जगभरामध्ये आज त्याचे असंख्य चाहते पाहायला मिळतात. त्यातच तरुणींमध्ये त्याची विशेष क्रेझ आहे. अगदी सामान्य मुलींपासून ते कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्रींपर्यंत साऱ्याच जणी त्याच्या प्रेमात आहेत. त्यामुळेच त्याला भेटण्याची अनेक तरुणींची इच्छा असते. त्यातच लिओनार्दोने स्वत: एका हॉलिवूड अभिनेत्रीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र ही संधी त्या अभिनेत्रीने गमावली असून आता तिला या गोष्टीचा पश्चाताप होत असल्याचं तिने मान्य केलं आहे.

गुड लुकिंग आणि अॅटीट्युडमुळे विशेष ओळखल्या जाणाऱ्या लिओनार्दोने हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री व्हिटनी पोर्टला वन नाईट स्टॅण्डची ऑफर दिली होती. मात्र त्यावेळी व्हिटनीने लिओनार्दोला नकार दिला होता. विशेष म्हणजे आता व्हिटनीला या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. व्हिटनीचं आता लग्न झालं असून तिला दोन वर्षांचा मुलगादेखील आहे. मात्र लिओनार्दोला नकार दिल्याचा पश्चाताप आजही तिला होत असल्याचं तिने सांगितलं.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना व्हिटनीने अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. “२००९ मध्ये हॉलिवूड स्टार लिओनार्दो दी कॅप्रिओने मला वन नाईट स्टॅण्डची ऑफर दिली होती. मात्र त्यावेळी मी त्याला नकार दिला होता. त्यावेळी मला लिओनार्दोसोबत एकटीला रहायचं नव्हतं. मी प्रचंड नर्व्हस झाले होते. कारण यापूर्वी मी कधीच असं काम केलं नव्हतं, त्यामुळे मी खूप अनकम्फर्टेबल होते. याच कारणास्तव मी लिओनार्दोला नकार दिला आणि माझ्या हातातील संधी सोडून दिली. लिओनार्दोला नकार दिल्यामुळे मला आयुष्यभर याचा पश्चाताप करावा लागेल”, असं व्हिटनी म्हणाली.

वाचा : ही अभिनेत्री म्हणते “सलमान खान करणार माझ्याशी लग्न”

पुढे ती म्हणते, एका पार्टीमध्ये माझी लिओनार्दोसोबत ओळख झाली होती. यावेळी आम्ही आमचे कॉन्टॅक्ट नंबरदेखील एकमेकांना शेअर केले होते. या ओळखीनंतर आमच्यात चांगली मैत्री झाली आणि लिओनार्दोने मला डेटसाठी विचारलं. मात्र मी या साऱ्याला नकार दिला. ही गोष्ट मला कित्येक वर्षांपासून कोणालातरी सांगायची होती. मात्र माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून कोणालाच काही सांगितलं नाही. खरं तर आता ही गोष्ट लिओनार्दोच्या लक्षातही नसेल. दरम्यान, व्हिटनीने टीम रोजमॅनसोबत लग्न केलं असून तिला २ वर्षांचा मुलगा आहे. तर लिओनार्दो सध्या कॅमिला मूरला डेट करत आहे.

First Published on August 19, 2019 2:31 pm

Web Title: reality tv star says refusing one night stand leonardo dicaprio is one of her bigger regrets in life ssj 93