26 January 2021

News Flash

कमबॅक! रेमोने शेअर केला वर्कआऊटचा व्हिडीओ

पाहा, रेमोने शेअर केलेला वर्कआऊटचा व्हिडीओ

बॉलिवूडमधील प्रसिद्घ नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून घरी परतलेला रेमो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. विशेष म्हणजे प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाल्यानंतर तो लगेच त्याच्या फिटनेसकडे वळला आहे. त्याने अलिकडेच जीममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

रेमोने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याला जीमचे प्रशिक्षक ट्रेनिंग देताना दिसत आहेत. यावेळी रेमोने दोन्ही हातात डंबल्स घेतले असून तो बायसेप्स करताना दिसत आहे. कमबॅक हे सेटबॅकपेक्षा जास्ट स्ट्राँग असतं. आजच सुरुवात केली आहे. त्यामुळे हळूहळू का होईना पण सुरुवात तर आहे, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)


दरम्यान, हा वर्कआऊट करताना त्याने पांढऱ्या रंगाचे शूज, राखाडी रंगाची पॅण्ट आणि काळ्या रंगाची टोपी परिधान केली आहे. कमी कालावधीत रेमोचा हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 3:26 pm

Web Title: remo dsouza hits gym post health scare comeback always stronger setback ssj 93
Next Stories
1 चाहत्याची सत्वपरीक्षा; महिन्याभरापासून चाहता ‘मन्नत’बाहेर उभा, कारण वाचून व्हाल थक्क
2 Video: ‘अजयला जेव्हा कळलं की मला करोना झालाय, तेव्हा…’, अभिषेकने केला खुलासा
3 सायबर क्राइमपासून रितेश देशमुख थोडक्यात बचावला, नाही तर…
Just Now!
X