News Flash

रेणुका शहाणे यांनी पहिल्याच चित्रपटात तारक मेहतामधील ‘या’ अभिनेत्यासोबत केले होते काम

रेणुका यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. मालिकेतील खास करुन जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांच्या चर्चा रंगलेल्या असतात. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांनी अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्यासोबत एका गुजराती चित्रपटात काम केले आहे.

रेणुका शहाणे यांनी गुजराती चित्रपटातून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटाचे नाव ‘हुं हंशी हंशीलाल’ असे आहे. या चित्रपटात रेणुका यांच्यासोबत दिलीप जोशी मुख्य भूमिकेत होते. तसेच मोहन गोखले आणि मनोज जोशी यांनी देखील भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजीव शाह यांनी केले होते.

 

View this post on Instagram

 

My first feature film ever was Hun Hunshi Hunshilal ( Love in the Time of Malaria) Gujarati, directed by Sanjiv Shah starring Dilip Joshi, Mohan Gokhale & Manoj Joshi. Now this timeless cult classic,a film socially and politically more relevant today than ever, a story of our, your and their times has been restored in 2k. This particular film was available only in a VHS rip till date. The film will be available for public viewing from 15th October onwards till 20th October in the new restored version. On 18th we also have a conversation with the director Sanjiv Shah, cinematographer Navroze Contractor & Music Director Rajat Dholakia for which the details will be updated very soon on Potato Eater’s YouTube channel. Please see the trailer on the link below https://www.youtube.com/potatoeaterscollective

A post shared by Renuka Shahane (@renukash710) on

नुकताच रेणुका यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. दिलीप जोशी यांनी रेणुका शहाणे यांच्यासोबत बॉलिवूड चित्रपट ‘हम आपके हैं कौन’मध्ये देखील काम केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 7:37 pm

Web Title: renuka shahane work with dilip joshi in gujrati film avb 95
Next Stories
1 ‘खरंच तू लग्न करणार आहेस की…’, विशाल दादलानीचा नेहा कक्करच्या लग्नावर सवाल
2 “तैमूरला रामायण आवडते आणि तो स्वत:ला श्रीराम समजतो”
3 ‘पेड न्यूज चालतात पण प्रेक्षकांचे प्रश्न नाही’; बॉलिवूड कलाकारांवर विवेक अग्निहोत्री संतापला
Just Now!
X