News Flash

‘निर्णय प्रेक्षक घेतील’; करणी सेनेच्या नोटीशीला प्रकाश झा यांचं उत्तर

करणी सेनेच्या नोटीशीवर प्रकाश झा यांचं उत्तर, म्हणाले...

अलिकडेच ‘आश्रम 2’ या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र, हा ट्रेलर पाहिल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याचं म्हणत करणी सेनेने प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीवर दिग्दर्शक प्रकाश झा यांनी उत्तर दिलं आहे. ‘बॉलिवूड हंगामा’नुसार, प्रकाश झा यांनी कायदेशीर उत्तर न देता एका स्टेटमेंटच्या माध्यमातून हे उत्तर दिलं आहे.

“त्यांनी केलेल्या मागणीवर उत्तर देणारा मी कोणी नाही. या सीरिजच्या पहिल्या सीजनला ४०० मिलिअन व्ह्युज मिळाले होते. मला वाटतं कोणताही निर्णय घेण्यासाठी प्रेक्षक समर्थ आहेत. त्यामुळे हा विषय आपण प्रेक्षकांवरच सोडून देऊयात. तेच योग्य तो निर्णय घेतील”, असं प्रकाश झा म्हणाले.

आणखी वाचा- ‘आश्रम-चॅप्टर-2- द डार्क साइड’ वादाच्या भोवऱ्यात; करणी सेनेची प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस

करणी सेनेच्या राज्य संघटनेचे सरचिटणीस सुरजित सिंह यांनी प्रकाश झा यांना ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसंच प्रकाश झा यांच्यासोबत ‘एमएक्स प्लेअर’ या ओटीटी प्लॅटफॉर्मलादेखील नोटीस बजावली आहे. ‘आश्रम’ या वेब सीरिजमधून धार्मिक परंपरा, प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि आश्रम धर्म यांच्याविषयी चुकीचा समज परसविला जात असल्याचं करणी सेनेने त्यांच्या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटलं आहे.

पाहा फोटो >> PHOTOS: ‘आश्रम’ वेब सीरिजमधला छाप सोडणारा चेहरा त्रिधा चौधरी

दरम्यान, अलिकेड ‘आश्रम-चॅप्टर-2- द डार्क साइड’ या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात ट्रेलरमध्ये हिंदू चालीरिती आणि आश्रम व्यवस्थेविषयी भाष्य करण्यात आलं होतं. ‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल व्यतिरिक्त अदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ही सीरिज येत्या ११ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 9:49 am

Web Title: report prakash jha reacts to karni senas legal notice demanding ban on web series aashram chapter 2 the dark side ssj 93
Next Stories
1 ‘आश्रम-चॅप्टर-2- द डार्क साइड’ वादाच्या भोवऱ्यात; करणी सेनेची प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस
2 न्यूड फोटोशूटप्रकरणी मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल
3 VIDEO: “मी देशवासीयांना प्रेरित करणार”; बॉलिवूड अभिनेत्यानं करोनावर लिहिलं पुस्तक
Just Now!
X