News Flash

‘करण-अर्जुन’ला एकत्र आणण्यास भन्साळींना येणार का यश?

आगामी चित्रपटात दोघांनी एकत्र काम करावं अशी भन्साळींची इच्छा आहे.

रुपेरी पडद्यावरची करण- अर्जुनची हिट जोडी भन्साळींच्या आगामी चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार अशी चर्चा आहे. २००२ साली आलेल्या ‘हम तुम्हारे हे सनम’ चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर सलमानच्या ‘ट्युबलाइट’मध्ये शाहरूख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या शाहरूखच्या ‘झिरो’मध्ये सलमानची अगदी छोटीशी भूमिका होती. मात्र बॉलिवूडमधले प्रसिद्ध दिग्दर्शक शाहरूख- सलमानला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटात दोघांनी एकत्र काम करावं अशी भन्साळींची इच्छा आहे.

तब्बल १९ वर्षांनी सलमान भन्साळींसोबत काम करत आहे. ही प्रेमकथा असणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत शाहरूखच्या नावाचा विचारही संजय लिला भन्साळी करत आहेत. जर शाहरूखनं होकार दिला तर करण- अर्जुनच्या जोडीला एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळेल. २०२० च्या इदला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं समजत आहे. या चित्रपटात अभिनेत्री कोण असेल हे मात्र अजूनही ठरलं नाही. अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या नावाचा विचार चित्रपटासाठी सुरू असल्याचंही समजत आहे.

याव्यतिरिक्त अमृता प्रीतम आणि साहिर लुधियानवी यांच्या अमर प्रेमकथेवर आधारित चित्रपट घेऊन संजय लिला भन्साळीं येत असल्याचा चर्चाही बॉलिवूडमध्ये आहेत. यात ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 1:09 pm

Web Title: reports suggest shah rukh khan will play role with salman khan in sanjay leela bhansali movie
Next Stories
1 Video : कार्तिक-साराचा किसिंग व्हिडिओ लीक
2 सूडबुद्धीने पेटून उठलेली ‘मॅलेफिसन्ट’ परत येतेय
3 नागराज म्हणतोय, ‘उत्तर माहित असेल तर मिस्ड कॉल द्या आणि करोडपती व्हा!’
Just Now!
X