19 September 2020

News Flash

प्रसारमाध्यमांवर रियाची आगपाखड; कॅमेरा पाहून दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन

रागाच्या भरात रियाने दिली 'ही' रिअ‍ॅक्शन

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सध्या सीबीआय तपास सुरु आहे. सीबीआयने आतापर्यंत ७ जणांची चौकशी केली आहे. विशेष म्हणजे य प्रकरणी सध्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती सर्वाधिक चर्चेत असून विविध स्तरांमधून तिची चौकशी सुरु आहे. अलिकडेच सीबीआयाने रियाची १० तास चौकशी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तिची चौकशी करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. याच काळात रियाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रियाने प्रसारमाध्यमांवर तिचा राग काढल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्य रिया पाहिल्यानंतर छायाचित्रकारांनी तिच्या गाडीला विळखा घातला. परंतु, गाडी बसल्यावर रियाने संताप व्यक्त केला. तिने जोरात गाडीच्या काचेवर स्वत:चे हात आपटले. तिची ही रिअ‍ॅक्शन अनेकांच्या कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर अनेकांनी तिला ट्रोल करत त्यावर मीम्सदेखील तयार केले आहेत.

वाचा :  सुशांत सिंह मृत्यूप्रकरण : दिपेश सावंत व सिद्धार्थ पिठानी होणार माफीचे साक्षीदार?

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यात सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. रिया माझ्या मुलाला विष पाजत होती, असं सुशांतच्या वडिलांनी एएनआयच्या मुलाखतीतदेखील सांगितलं होतं. मात्र, रियाने हे आरोप फेटाळून लावले आहे. अलिकडेच तिने दिलेल्या एका मुलाखतीत सगळे आरोप फेटाळून लावत. हे आरोप अर्थहीन आणि निरर्थक असल्याचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 10:51 am

Web Title: rhea chakraborty angry reaction after seeing media video viral on internet ssj 93
Next Stories
1 ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात ‘आनंदी गोपाळ’, ‘आटपाडी नाइट्स’चं वर्चस्व
2 नागार्जुनमुळे आजही ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री अविवाहित
3 “नाईट क्लबमध्ये माझ्यावर झाला होता हल्ला”; सैफने सांगितला धक्कादायक अनुभव
Just Now!
X