बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज चॅट समोर येताच एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती. रियासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती. त्यानंतर रियाची जामीनावर सुटका झाली. आता रिया मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर फिरताना दिसते. नुकताच रियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती फोटोग्राफर समोर हात जोडताना दिसते.
वूपंलाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रियाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती वांद्रे परिसरात असल्याचे दिसत आहे. तिच्या आजूबाजूला फोटोग्राफर उभे असल्याचे देखील दिसत आहे. दरम्यान रिया त्यांच्या समोर हात जोडते आणि आता मी चालले आहे. कृपया माझ्या मागे येऊ नका असे बोलून ती कारमध्ये बसून तेथून निघून जाताना दिसत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये रियाने ब्लॅक ट्राउजर आणि राखाडी रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. हा व्हिडीओ जवळपास १८ हजार लोकांनी पाहिला आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
रिया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा रियाची मैत्रिण रुमि जाफरीने ती लवकरच चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितल्यामुळे सुरु झाल्या. रिया २०२१मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चेहरे चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जाते.