News Flash

“या चीनचं काहीतरी करा”; रिचा चड्ढाने केली अमित शाहांवर टीका

अमित शाहांवर लगावला उपरोधिक टोला

रिचा चड्ढा

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती कामय समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवरुन मोदी सरकारवर टीका करत असते. यावेळी तिने भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “या चीनचं काहीतरी करा” असा टोला तिने लगावला आहे.

“आम्हाला कोणाचं काही हिसकावून घ्यायचं नाही. परंतु जर कोणी आमचं काही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही चांगलंच उत्तर देऊ.” असं ट्विट भाजपाच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं होतं. या ट्विटवरुन रिचाने अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “या चीनचं काहीतरी करा” अशा आशयाचे ट्विट तिने केलं आहे.

काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. परंतु सध्याच्या काळात पाकिस्तानसोबतच चीन देखील भारताला धमकीवजा इशारे देत आहे. या पार्श्वभूमीवर चीनला देखील मोदी सरकारने धडा शिकवावा असा देशवासीयांचा कल आहे. या वातावरणात रिचाचे हे ट्विट सोशल मीडियावर सध्या सर्वांचेच लक्ष वधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 6:51 pm

Web Title: richa chadda comment on amit shah mppg 94
Next Stories
1 एकता कपूरने केला भारतीय सैनिकांचा अपमान?; ‘हिंदुस्तानी भाऊ’ने केली पोलीस तक्रार
2 झी मराठीवर मर्यादित भागांच्या नव्या मालिका
3 जेनेलिया की मार्व्हल? नेमकं तुझ्या आईचं नाव काय? ; रितेशला पडला प्रश्न
Just Now!
X