News Flash

कुंभमेळ्यातील अफाट गर्दी पाहून संतापली अभिनेत्री, म्हणाली…

तिचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

(PHOTO CREDIT : ANI)

जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक अशी ओळख असणाऱ्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. १२ वर्षातून एकदा होणारा कुंभमेळा सध्या करोनाच्या संकटात पार पडत आहे. एकीकडे करोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे यावेळी लोकांकडून करोनाच्या नियमांचे जाहीरपणे उल्लंघन करण्यात आले. मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन यावेळी करण्यात आले नाही. दरम्यान कुंभमेळ्यातील अफाट गर्दीपाहून बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने संताप व्यक्त केला आहे.

कुंभमेळ्यातीली तुफान गर्दीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील काही फोटो आणि व्हिडीओ अभिनेत्री रिचा चड्ढाने ट्विटर अकाऊंटवर ट्वीट केले आहेत. हे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत तिने ‘हा कार्यक्रम करोना सुपर स्प्रेडर आहे’ असे म्हटले आहे. रिचाच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत तुझे अगदी बरोबर आहे असे म्हटले.

आणखी वाचा : ‘मिसेस श्रीलंका’ विजेतीचं मुकूट हिसकावल्यामुळे परिक्षकाला अटक

गंगा नदीत स्नान करण्यासाठी पवित्र दिवस मानल्या जाणाऱ्या शाही स्नानाच्या एक दिवस आधी लाखोंच्या संख्येने भक्तांनी नदीकिनारी गर्दी केली होती. आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमांचे जाहीरपणे हे उल्लंघन होते. अनेक भाविकांनी यावेळी हरिद्वारला येताना निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे सरकारने अनिवार्य केले असल्याने करोना हा येथे चिंतेचा विषय नसल्याचा दावा केला.

हरिद्धारमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ३८६ करोना रुग्ण आढळले आहेत. शहरात सध्या २०५६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन आणि अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येत जवळपास १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 6:33 pm

Web Title: richa chadha shares haridwar kumbh mela video and calls it super spreader event avb 95
Next Stories
1 अभिनेत्री रिद्धिमा पंडितच्या आईचे करोनामुळे निधन
2 ‘रात्रीस खेळ चाले’; “नाईक परिवाराखडसून तुमका सगळ्यांका…”
3 हा गुढीपाडवा साजरा करा ‘गुढीपाडवा फिल्म फेस्टिवल’ सोबत
Just Now!
X