06 March 2021

News Flash

रिचा चड्ढाच्या ‘मॅडम चीफ मिनिस्टर’चा ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट २२ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

भारतातील चित्रपटगृहे पुन्हा एकदा सुरू झाले असून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांचे चित्रपट चित्रपटगृहात बसून पाहायला मिळणार आहेत. बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाचा ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या नावावरून हा पॉलिटीकल थ्रीलर चित्रपट असल्याचे समजते. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रिचाचा दमदार अभिनय पाहायला मिळतोय. ती खूप संघर्ष करून मुख्यमंत्री होते. ट्रेलरमध्ये रिचा मंदिरात फक्त उच्चवर्गीयांच्या प्रवेशावर प्रश्न उपस्थित करते. ट्रेलरमध्ये रिचाचे दमदार डायलॉग आहेत. तर ट्रेलरच्या शेवटी रिचा जनतेसमोर म्हणते, “तुमचे प्रश्न सगळ्यांसमोर ठेवण्यापासून, तुमची सेवा करण्यापासून, मला कोणीच थांबवू शकत नाही.”

आणखी वाचा : बेधडक वक्तव्य करणाऱ्या, सुपरहिट गाणी गाणाऱ्या दिलजीतविषयी काही खास गोष्टी..

या चित्रपटात रिचा मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष कपूर करणार आहेत. त्यांनीच या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात रिचा चड्ढासोबतच मानव कौल आणि सौरभ शुक्ला मुख्य भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट २२ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2021 5:07 pm

Web Title: richa chadhas new movie trailer released dcp 98
Next Stories
1 अभिमन्यू -लतिका मिळून करणार संकटांवर मात; रंगणार महारविवारचा विशेष भाग
2 ‘कागझ’मध्ये सलमान खानचा महत्वपूर्ण सहभाग; ‘या’ कवितेला दिला आवाज
3 म्हणून हॉलिवूड चित्रपटात ए. आर. रेहमान यांचे ‘छैय्या छैय्या’ गाणे आले होते वापरण्यात
Just Now!
X