२०२० हे वर्ष फिल्मी दुनियेसाठी खूपच त्रासदायक ठरत आहे. या वर्षात इरफान खान, ऋषी कपूर, वाजित खान, बासू चटर्जी यांसारखा प्रतिभाषाली कलाकारांचे निधन झाले. या यादीत आता आणखी एका कलाकाराचे नाव जोडले जात आहे. प्रसिद्ध भोजपूरी संगीतकार, गायक धनंजय मिश्रा यांचे गुरुवारी सकाळी सात वाजता निधन झाले.

ते गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. मुंबईत उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अभिनेता निरहुआ याने ट्विट करुन ही दु:खद बातमी चाहत्यांना दिली. “धनंजय मिश्राजी यांच्या निधनामुळे आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे. तुम्ही कायम आमच्या हृदयात राहाल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना!” अशा आशयाचे ट्विट करुन निरहुवा याने श्रद्धांजली अर्पण केली आहे.

संजय मिश्रा भोजपूरी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध संगीतकार होते. ‘रिंकिया के पापा’ या सुपरहिट गाण्यामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्यात भोजपूरी मेगास्टार मनोज तिवारी यांनी नृत्य केले होते. या व्यतिरिक्त ‘लबो रोए मत ना’, ‘चप्पल चला के’, ‘श्याम चूडी बेचने आया’, ‘तुम हमके भुला जाए ना’ यांसारख्या अनेक लोकप्रिय गाण्यांची निर्मिती त्यांनी केली आहे.