News Flash

Photo : ‘मेकअप’मधील रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

रिंकू पहिल्यांदाच अशा रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे

रिंकू राजगुरू

२९ एप्रिल २०१६ रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने सपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं. अनेकांनी हा चित्रपट पाहिला असेल तर काहींनी केवळ त्याबद्दल वाचलं असेल. पण या चित्रपटातील आर्ची अर्थात रिंकू राजगुरू साऱ्यांच्याच लक्षात राहिली. पहिल्यांदाच कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने पहिल्याच चित्रपटातून तुफान लोकप्रियता मिळविली. त्यानंतर तिने ‘कागर’ या चित्रपटातही काम केलं. विशेष म्हणजे ती लवकरच ‘मेकअप’ या चित्रपटात झळकणार असून पहिल्यांदाच ती एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

आपल्या खऱ्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करून समोर आलेला दुसरा चेहरा म्हणजे मेकअप. हा मेकअप केवळ चेहऱ्याचाच असतो असे नाही, हा मेकअप व्यक्तिमत्वाचाही असू शकतो. आता व्यक्तिमत्वाचा मेकअप कसा असेल, हा प्रश्न जर तुमच्या डोक्यात आला असेल तर याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहे. गणेश पंडित दिग्दर्शित ‘मेकअप’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मेकअप’च्या जबरदस्त टीझरनंतर आता या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.

 

View this post on Instagram

 

पुर्वी

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये काचेच्या इमारतीजवळ पारंपारिक वेशात उभ्या असणाऱ्या रिंकू राजगुरूचे प्रतिबिंब एका वेगळ्याच वेशात दिसत आहे. कधी कधी माणसाचे प्रतिबिंब हे त्यांच्या मूळ व्यक्तिमत्वापेक्षा जास्त बोलके असते. त्यामुळे समोरची व्यक्तीही संभ्रमात पडते, की नक्की खरं कोण? हे पोस्टर बघून प्रेक्षकांचीही काहीशी अशीच अवस्था झाली असेल. यात समाजासमोर वावरणारा पूर्वीचा म्हणजेच रिंकूचा सोज्वळ, समंजस चेहरा तिच्या स्वतःच्या विश्वात मात्र पूर्णपणे वेगळा आहे. बिनधास्त, बोल्ड, स्पष्टवक्ती, स्वच्छंदी आयुष्य जगणारी अशी तिच्या जगण्याची दुसरी बाजू आहे. परंतु पूर्वीने हा ‘मेकअप’ का केला असेल, हे मात्र चित्रपट आल्यावरच कळेल.

सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. निर्मित आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत ‘मेकअप’ या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबतच चिन्मय उदगीरकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 4:48 pm

Web Title: rinku rajguru make up movie rinku new look ssj 93
Next Stories
1 सयाजी शिंदेंचा प्रेरणादायी प्रयोग, उजाड माळरानावर फुलवलं नंदनवन
2 अक्षयसाठी ‘बॅड न्यूज’; चित्रपटाविरोधात याचिका दाखल
3 पर्यावरणावर आधारित चित्रपटात झळकणार सयाजी शिंदे
Just Now!
X