देशातील करोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे सर्वचजण घरात बसून मोदींच्या या निर्णयाला पाठिंबा देत असल्याचे दिसत आहे. पण सतत चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असलेले कलाकार घरात बसून काय करत असतील असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला पाहूया महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनावर राज्य करणारी रिंकू राजगुरु घरात सध्या काय करते.
नुकताच रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आईला स्वयंपाकात मदत करताना दिसत आहे. ती पोळ्या लाटत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘Stay home stay safe. घरी रहा. आईला घर कामात मदत करा, पुस्तके वाचा, चित्रपट बघा, चित्रे काढा, व्यायाम करा. काळजी घ्या’ असे कॅप्शन देत लोकांना घरी बसण्याचे आवाहन केले आहे.
View this post on Instagram
सध्या करोना व्हायरसमुळे सर्वच चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच कलाकार आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. काही दिवासांपूर्वी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा भाचा अहिल सोबत बागेत फळे तोडतानाचा व्हिडीओ समोर आला होता. तर स्टार किड तैमूर वडिल सैफ अली खानसोबत झाडे लावताना दिसला.