News Flash

बियॉन्सेच्या फोटोची खिल्ली उडवल्याने ऋषी कपूर ट्रोल

नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

ऋषी कपूर

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त ट्विट्समुळे चर्चेत असतात. या ट्विट्समुळे अनेकदा ते ट्रोलही झाले. प्रसिद्ध अमेरिकी पॉपस्टार बियॉन्सेच्या एका फोटोची खिल्ली उडवल्याने ते पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रोल झाले. तिच्या गरोदरपणातील फोटोची तुलना फुलदाणीशी केल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला.

ऋषी कपूर यांनी ट्विटरवर एक मीम पोस्ट केले. यामध्ये एका बाजूला बियॉन्सेचा गरोदरपणातील फोटो तर दुसरीकडे फुलदाणी पाहायला मिळत आहे. या मीमच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘फुल खिले है गुलशन गुलशन!’ यावरूनच ट्विटरकरांचा पारा चढला. गरोदर महिलेची अशा प्रकारे थट्टा करणे तुम्हाला शोभते का?, असा सवालही एका नेटकऱ्याने केला.

ट्विटवरून ट्रोलला सामोरे जाण्याची त्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे ऋषी कपूर यांनी ट्विटरवर समर्थन केल्याने नेटकऱ्यांनी टीका केली होती. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा पाकिस्तानचा भाग असून, त्याला पाकपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे वादग्रस्त विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. त्यावर ट्विट करत ऋषी कपूर यांनी त्यांचे समर्थन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 10:28 am

Web Title: rishi kapoor is again trolled on twitter for posting meme about beyonce
Next Stories
1 सुयश, अक्षयाच्या आयुष्यातील ‘बापमाणूस’ माहितीये का?
2 मिस वर्ल्ड स्पर्धा कालबाह्य – सोफिया हयात
3 जाणून घ्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा ‘डाएट प्लॅन’
Just Now!
X