स्वप्ने पाहण्याला आणि महत्वाकांक्षेला काही वय नसते. तसेच त्यांना मर्यादा किंवा एखाद्याच्या परिस्थितीचाही अडथळा येत नाही. त्यात फक्त कौशल्य पाहिले जाते. कलर्सने भावना, विचार आणि पूर्वग्रहांनी बनलेल्या विचारांच्या प्रक्रियांचे अडथळे तोडून टाकत भारताचा पुढील संगीत सेन्सेशन शोधण्याचा प्रवास सुरू केला आहे. सीझन १ च्या दिमाखदार यशानंतर, चॅनेलने आता टॅलेंट प्रदर्शित करण्यासाठी ‘रायझिंग स्टार २’ भारताचा पहिला लाइव्ह शो पुन्हा आणण्याची तयारी केली आहे.

ऑप्टिमिस्टीक एण्टरटेनमेन्ट निर्मित हा शो क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज होत आहे, २० जानेवारी २०१८ पासून प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त कलर्सवरच स्वयंपाकघरात जेवण करणारी महिला असो, रोजीरोटीसाठी लोकांना वाहून नेणारा रिक्षा ड्रायव्हर असो किंवा एखादा छोटा खाद्यपदार्थ पोहचविणारा डिलीव्हरी बॉय असो जगाला रिझविण्याची ताकद आणि कौशल्य सर्वांमध्येच असते हे रायझिंग स्टार २ मधून दाखविले जाणार आहे. घरगुती हिंसाचाराविरुध्दची तुमची लढाई असो किंवा एकटी आई असो किंवा तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असो या मंचावर येऊन पुढील रायझिंग स्टार होण्यासाठी यातील काहीही तुम्हाला रोखू शकणार नाही. सोच की दीवार उघडण्यासाठी प्रत्येकाने एकत्र या आणि #UthaoSochKiDeewar, #RisingStar2 या हॅशटॅग द्वारे चमकदार स्टार होण्यासाठी तयार व्हा.
गायन सम्राट दिलजित दोसांझ, शंकर महादेवन आणि मोनाली ठाकूर हे परीक्षक असणार आहेत तर सीझनच्या या आवृत्तीचे सूत्रसंचालन रवि दुबे आणि बालकलाकार पार्थ धमिजा करणार आहेत.

कार्यक्रमाबद्दल शंकर महादेवन म्हणाले, ‘तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता यावर माझा गाढ विश्वास आहे. ही एक विचार प्रक्रिया आहे, जी तुमच्या इच्छा शक्तीच्या जोरामध्ये गुंतलेली असते. या मंचावर येण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना करणाऱ्या रायझिंग स्टार गायकांच्या कहाण्या आम्हाला ऐकायला मिळाल्या आहेत. धर्म, जात, लिंग कुटंब किंवा शेजारी या सर्वांच्या अडथळ्यांवर या स्पर्धकांनी मात केली आणि त्यांच्या मधुर आवाजाने आमची मने जिंकली.’ तर मोनाली ठाकूरच्या मते, ‘एखाद्या व्यक्तीला मानसिकरीत्या बरे करण्यासाठी संगीत आणि त्याच्या स्वरांचा चांगला उपयोग होता यावर माझा विश्वास आहे आणि त्यामुळे संगीत हे माझ्या जीवनाचा एक भाग आहे. संगीत ही एक थेरपी आहे आणि लोकांना मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावण्यात एक कला म्हणून त्याने मला खूप आनंद दिलेला आहे.’

‘रायझिंग स्टार २’ च्या रुजलेल्या वाटा मोडणारी संकल्पना स्पर्धकांच्या कौशल्य आणि टॅलेंटवर संपूर्णपणे भर देते. वयाची किंवा कोणत्याही बंधनाची अट नसलेला हा शो सोलो, ड्युएट आणि ग्रुप/बँड परफॉर्मन्स साठी खुला आहे. प्रेक्षकांचे लाइव्ह मनोरंजन करून मुग्ध करण्याची त्यांची क्षमता आणि त्यांचा आवाज त्यांना राष्ट्रीय प्रसिध्दी मिळवून देणार आहे. त्यांच्या पाठिंब्याच्या प्रत्येक मतामध्ये त्यांचे नशीब त्वरित बदलून टाकण्याची ताकद आहे.