News Flash

Video : लग्नात शपथ घेतली का?; कपिलच्या प्रश्नावर रितेशचं भन्नाट उत्तर

रितेशने उत्तर देताच सेटवर एकच हशा पिकला.

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. या जोडीकडे पाहिले की जेनेलिया आणि रितेश एकमेकांसाठीच बनले आहेत, हे कोणीही मान्य करेल. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. नुकतीच या जोडीने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून त्यामध्ये कपिल रितेशला लग्नाविषयी एक खास प्रश्न विचारताना दिसून येतोय.

रितेश हा अभिनेता असला तरी एका राजकीय कुटुंबातला आहे, त्यामुळे लग्नात तुम्ही सप्तपदी घेतली की शपथ घेतली असा गमतीशीर प्रश्न कपिलने या दोघांना विचारला. तेव्हा आपल्या विनोदबुद्धीसाठी ओळखला जाणारा रितेशनेही त्याला भन्नाट उत्तर दिलं. “शपथ घेतली की सरकार फक्त पाच वर्षांसाठी असतं. पाच वर्षांनंतर सरकार बदलतं”, असं उत्तर देताच सेटवर एकच हशा पिकला.

आणखी वाचा : ..म्हणून अजय देवगणने आजपर्यंत नाही पाहिला काजोलचा DDLJ 

२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर जेनेलिया व रितेश एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१२ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली आणि त्यांना रियान व राहील अशी दोन मुलं आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 11:16 am

Web Title: riteish deshmukh genelia dsouza are asked why they took pheras and not an oath at their wedding ssv 92
Next Stories
1 ‘या’ चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक
2 ..म्हणून अजय देवगणने आजपर्यंत नाही पाहिला काजोलचा DDLJ
3 ‘धडाकेबाज’ दिग्दर्शक महेश कोठारे ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर
Just Now!
X