News Flash

Video : लॉकडाउनमुळे घरात बसलेल्या रितेशला जेनेलियाने घासायला लावली भांडी

रितेशचा व्हिडीओ होतोय व्हायरल...

रितेश देशमुख चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. लॉकडाउनमुळे घरात थांबलेल्या रितेशने यावेळी चक्क भांडी घासतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आपले हसू आवरता येणार नाही.

अभिनेता अजय देवगनचा आज वाढदिवस आहे. अजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने हा व्हिडीओ रितेशने पोस्ट केला आहे. मात्र गंमतीशीर बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये रितेशची पत्नी जेनेलिया त्याच्याकडून चक्क भांडी घासून घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये बॅकराऊंडला अजय देवगनच्या ‘दिलवाले’ या चित्रपटातील ‘मौका मिलेगा तो हम बता देंगे’ हे गाणे वाजत आहे.

लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आपल्या घरात कैद झाले आहेत. त्यामुळे त्यांचे आवडते सेलिब्रिटी घरात बसून काय करत आहेत? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर रितेशने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2020 6:51 pm

Web Title: riteish deshmukh genelia dsouza coronavirus lockdown mppg 94
Next Stories
1 सध्याच्या स्थितीत हे देशावर दहशतवादी हल्ला करण्यासारखंच : आदिनाथ कोठारे
2 Video : द ग्रेट खलीला आव्हान देणाऱ्या तरुणाची झाली अशी अवस्था
3 लॉकडाउनमुळे प्रत्युषाच्या स्मृतिदिनासाठी फुलं उपलब्ध नाहीत; वडिलांनी व्यक्त केली खंत
Just Now!
X