05 June 2020

News Flash

शिवाजी महाराजांवर रितेश देशमुखचा चित्रपट

या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत, असेही ट्वीटमध्ये म्हटले आहे.

रितेश देशमुख

छत्रपती शिवाजी महाराजांवर आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट येऊन गेले आहेत. आता अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख शिवाजी महाराजांवरील मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी सज्ज झाले आहेत. रितेशने नुकतीच या संदर्भातील घोषणा ट्विटरवरून केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत, असेही ट्वीटमध्ये म्हटले आहे.

‘लय भारी’द्वारे मराठी चित्रपटांच्या रुपेरी पडद्यावर अवतरलेल्या रितेशने ‘बालक पालक’द्वारे चित्रपटनिर्मितीत प्रवेश केला आहे. काही काळापूर्वी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यावर मराठी चित्रपट करण्यासाठी रितेशने प्रयत्न सुरू केले होते. शिवाजी महाराजांवरील चित्रपटात महाराजांच्या भूमिकेत कोण झळकणार याविषयी आता कुतूहल निर्माण झाले असून ही भूमिका रितेश देशमुख स्वत:च साकारणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही घोषणा अथवा विधान रितेशने ट्विटरवर केलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2015 2:24 am

Web Title: riteish deshmukh making a movie on shivaji maharaj
Next Stories
1 ‘लंडनच्या आजीबाई’
2 ‘थर्ड आय’महोत्सवात वहिदा रेहमान यांचा सत्कार
3 बॉलीवुडची सूत्रे पुन्हा ‘खाना’वळीकडेच
Just Now!
X