News Flash

#MeToo : मत तयार करण्याआधी त्या महिलांचं ऐकून घ्या- रितेश देशमुख

'महिला मोठ्या धाडसानं आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. कोणत्याही महिलेबाबत गैरसमज करून घेण्यापेक्षा तिचं म्हणणं पहिल्यांदा ऐकलं पाहिजे'

रितेश देशमुख

गेल्या काही आठवड्यापासून बॉलिवूडमध्ये ‘मी टु’ मोहीम जोर धरू लागली आहे. महिलांच्या समर्थनार्थ अनेक बॉलिवूड कलाकार पुढे आले आहेत. आता अभिनेता रितेश देशमुख यांनं देखील पीडित महिलांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच अक्षयनं हाऊसफुल ४ संदर्भात घेतलेला निर्णय योग्य असून मी त्याच्या निर्णयाशी सहमत आहे असंही रितेश ट्विट करून म्हणला आहे.

‘गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टी ऐकायला मिळत आहे त्यामुळे मी अस्वस्थ आहे. प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना लैंगिक छळ, गैरवर्तणुकीला समोरं जावं लागत आहे. पण महिला मोठ्या धाडसानं आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. कोणत्याही महिलेबाबत गैरसमज करून घेण्यापेक्षा तिचं म्हणणं पहिल्यांदा ऐकलं पाहिजे. मी त्या प्रत्येक महिलेच्या बाजूनं उभा आहे. तसेच अक्षयनं हाऊसफुल ४ संदर्भात घेतलेला निर्णय योग्य असून मी त्या निर्णयाशी सहमत आहे’ असं रितेशनं त्याच्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘हाऊसफुल ४’ चा दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या आरोपांनंतर अक्षय कुमारनं या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्याची विनंती निर्मात्यांना केली. तसेच साजिद खानसोबत काम न करण्याचा निर्णयही बोलून दाखवला. अक्षयच्या या निर्णयानंतर त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिनंदेखील ‘हाऊसफुल ४’ च्या कलाकरांनी या प्रकरणात ठोस भूमिका घ्यावी असं आवाहन केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 12:20 pm

Web Title: riteish deshmukh on sajid khan and housefull 4
Next Stories
1 #MeToo : आता विकी कौशलचे वडीलही आरोपीच्या पिंजऱ्यात
2 माझ्यावरचे आरोप निराधार, CINTAA च्या नोटिसीला आलोक नाथांचे उत्तर
3 साजिदनंतर नाना पाटेकरही ‘हाऊसफुल ४’ मधून बाहेर?
Just Now!
X