28 September 2020

News Flash

रितेशने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य; व्हिडीओ होतोय व्हायरल

रितेशने पोस्ट केला विनोदी व्हिडीओ

रितेश देशमुख चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियाव्दारे तो कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. लॉकडाउनमुळे घरात थांबलेल्या रितेशने यावेळी चक्क पत्नीचे पाय दाबतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आपले हसू आवरता येणार नाही.

अवश्य पाहा – राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात पॉर्नस्टार; हा पाहा चित्रपटाचा टीझर

अवश्य पाहा – ‘युट्यूब’ विरुद्ध ‘टिक-टॉक’ वादात केआरकेची उडी; “म्हणे मी दोघांपेक्षा श्रेष्ठ”

या व्हिडीओमध्ये रितेशने सुखी विवाहित जीवनाचे रहस्य सांगितले आहे. जर विवाहित पुरुषांना सुखी राहायचे असेल तर त्यांनी आपल्या पत्नीचे पाय दाबावेत असा सल्ला त्याने दिला आहे. दरम्यान या व्हिडीओमध्ये तो स्वत: देखील पत्नी जेनेलियाचे पाय दाबताना दिसत आहे.

लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आपल्या घरात कैद झाले आहेत. त्यामुळे त्यांचे आवडते सेलिब्रिटी घरात बसून काय करत आहेत? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर रितेशने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 12:52 pm

Web Title: riteish deshmukh secret behind happy married life mppg 94
Next Stories
1 राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात पॉर्नस्टार; हा पाहा चित्रपटाचा टीझर
2 गरजुंच्या मदतीसाठी ‘दबंग गर्ल’ आली पुढे; कलेच्या माध्यमातून करणार आर्थिक सहाय्य
3 ‘कहानी घर घर की’ मालिकेतील अभिनेत्याचं निधन
Just Now!
X