25 September 2020

News Flash

रिया, शोविकच्या जामीन अर्जावर आज निर्णय

अटक झाल्यानंतर न्यायालयाने रियाला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती

अभिनेता सुशांतसिंह राजपूतला मृत्युपूर्वी अमली पदार्थ उपलब्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक या दोघांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालय आज, शुक्रवारी निर्णय देणार आहे.

रियाने अटकेनंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला आहे. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला.

रिया आणि शोविकच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. बी. गुरव यांनी चक्रवर्ती भावंडांची आणि पोलिसांची बाजू ऐकल्यावर सुनावणी शुक्रवारी ठेवली. या वेळी प्रकरणात अटकेत असलेल्या अन्य आरोपींच्या जामिनावरही सुनावणी झाली. या सगळ्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय शुक्रवारी निर्णय देण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:14 am

Web Title: riya shovik decision today on bail application abn 97
Next Stories
1 “जे भगतसिंग यांनी १९२० ला केलं तेच कंगना आता करत आहे”; अभिनेत्याने केली पोस्ट
2 बॉलिवूड कलाकार रियाला पाठिंबा का देतायत?; अनुराग कश्यपने सांगितलं कारण…
3 Photos : कंगनाकडून बांधकाम पाडलेल्या ऑफिसची पाहणी
Just Now!
X