News Flash

पुणे : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला

या प्रकरणी निगडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अलिकडेच विवाहबद्ध झालेली ‘नटरंग’फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निगडी येथील घरात ही घटना घडली आहे. हल्लेखोर सोनालीचा चाहता असल्याचे म्हटले जात आहे. त्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी निगडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. आरोपी अजय शेगटे सकाळी अचानक सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दारात आला. त्यावेळी सोनालीचे आई-वडील घरात होते. सोनालीच्या वडिलांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र माथेफिरु अजयने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत 63 वर्षीय मनोहर कुलकर्णी किरकोळ जखमी झाले आहेत. चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची तक्रार कुलकर्णींनी पोलिसांकडे दिली आहे. तपासादरम्यान आरोपीकडे खोटे पिस्तूल आणि चाकू पोलिसांना आढळले आहे.

कुलकर्णीच्या इमारतीतील रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडले. त्यानंतर पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेत अजयला ताब्यात घेतले. अजयने आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन असल्याचे सांगितले. निगडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 1:37 pm

Web Title: robber attack on actress sonalee kulkarni father avb 95
Next Stories
1 आशुतोष यांनी पहिल्याच भेटीत केला कौतुकाचा वर्षाव; रेणुका शहाणेंची खास लव्हस्टोरी
2 प्रियांका चोप्राने सांगितले सुखी संसाराचे रहस्य ; म्हणाली, “फक्त दोनच वर्ष झाली आहेत लग्नाला म्हणून….”
3 जातिवाचक शब्दांचा उल्लेख करणं अभिनेत्री युविका चौधरीला महागात; नेटकऱ्यांकडून अटकेची मागणी
Just Now!
X