News Flash

‘रॉक ऑन २’ चे हे आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन

नोट बंदीचा या सिनेमावर सगळ्यात मोठा फटका पडला

फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘रॉक ऑन २’ हा सिनेमा गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. नोट बंदीचा या सिनेमावर सगळ्यात मोठा फटका पडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

पहिल्या दिवशी या सिनेमाने केवळ ०२.०२ कोटी एवढीच कमाई केली होती. तरुण आदर्श यांनी यासंदर्भातली अधिक आकडेवारी त्यांच्या ट्विटरवर शेअर केली आहे. ही आकडेवारी शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘रॉक ऑन २’ ची आकडेवारी फार निराशाजनक आहे. या सिनेमाने शुक्रवारी फक्त ०२.०२ कोटींची कमाई केली. तर शनिवारी २.४२ कोटी कमावले. रविवारी कदाचित सिनेमाच्या कमाईमध्ये सुधारणा होईल असे वाटत होते. पण तरीही हा सिनेमा फक्त २.५८ कोटींचीच कमाई करु शकला. त्यामुळे एकूण मिळून या सिनेमाने आतापर्यंत फक्त ७.०१ कोटींचीच कमाई केली आहे.
हा सिनेमा बनवण्यासाठी एकूण ५५ कोटींचे बजेट बनवले गेले होते. त्यात पहिल्या आठवड्यातल्या या निराशाजनक कमाईमुळे सिनेमाची किमान रक्कमही मिळवणे निर्मात्यांना कठिण जाणार असेच दिसत आहे.

दरम्यान, फरहान अख्तरचा ‘रॉक ऑन २’ हा सिनेमा त्याच्या ट्रेलरमुळे आणि गाण्यांमुळे चांगलाच चर्चेत आला होता. या सिनेमाचे जोरदार प्रमोशनही करण्यात आले होते. हा सिनेमा गाण्यांवर आणि कॉन्सर्टवर आधारीत असल्यामुळे प्रमोशनच्या फण्ड्यांमध्ये कॉन्सर्टचा उपयोग करण्यात आला होता. फरहान आणि श्रद्धाची गाणी यावेळी ऐकायला मिळाली होती. या कॉन्सर्टला प्राचीनेही आवर्जुन हजेरी लावली होती. ‘रॉक ऑन २’मध्ये श्रद्धाला अधिक महत्त्व दिले जात असल्याने प्राची नाराज झाली असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. मात्र ‘रॉक ऑन २’च्या ट्रेलर प्रदर्शनादरम्यान प्राची श्रद्धाला प्रोत्साहन देतानाच दिसली. त्या दोघींमध्ये कोल्ड वॉर सुरु आहे, असे कुठेही दिसले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 8:01 pm

Web Title: rock on 2 box office collection day 4
Next Stories
1 ‘एक शून्य तीन’ नाटकातून स्वानंदीचे रंगभूमीवर पदार्पण
2 अमिताभ यांनी केली जया बच्चनची पोलखोल
3 आता सलमान क्रिकेटच्या मैदानात
Just Now!
X