03 December 2020

News Flash

दिग्दर्शकाच्या ‘त्या’ वागणुकीनंतर बॉलिवूडकडे पाठ फिरवली; रुबीना दिलैकने सांगितला धक्कादायक अनुभव

दिग्दर्शकाने रुबीनाला दिली अपमानास्पद वागणूक, म्हणाला...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुबीना दिलैक. अनेक गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून रुबीना घराघरात पोहोचली आहे. सध्या ती बिग बॉस १४ मध्ये सहभागी झाली असून अनेकदा चाहत्यांमध्ये तिची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच तिची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या करिअरचा संघर्ष सांगितला आहे. विशेष म्हणजे तिने सांगितलेले अनुभव थक्क करणारे आहेत.

अलिकडेच सूत्रसंचालक सिद्धार्थ कन्नन याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर रुबीनाच्या इंटरव्हुयचा व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये रुबीनाला कलाविश्वात आलेले अनुभव ती शेअर करताना दिसत आहे. यामध्येच ६ वर्षांपूर्वी तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी एका दिग्गज दिग्दर्शक, निर्मात्याने तिला दिलेली वागणूक अत्यंत चुकीची होती असं तिने सांगितल्याचं पाहायला मिळालं.

“६ वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मला या काळात अनेक वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं. कोणीही या काळात सहकार्य दाखवलं नाही. बॉलिवूडमध्ये छोट्या पडद्यावरील कलाकारांना तुच्छतेच्या नजरेने पाहिलं जातं. टीव्ही कलाकार आहे? बरं कोणता कार्यक्रम? आम्ही तर नाही पाहिलाय कधी? तिथे कायम तुम्हाला तुमच्या करिअरची पार्श्वभूमी,क्रेडेंशिअल, अप्रोच, गाडी यासारख्या गोष्टींवरुन पारखलं जातं. पण मी अजिबात कोणत्याही ब्रँण्डच्या प्रेमात नाहीये. पण, तिकडे हे सारं पाहून तुम्हाला जज केलं जातं. तसंच कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टचा भाग होण्यासाठी तुमच्या स्क्रीन टेस्टला जास्त महत्त्व आहे. हे सगळं पाहून मी गोंधळून गेले. या सगळ्याचा माझ्यावर नकारात्मक परिणाम झाला. मी सतत विचार करु लागले हे खरंच असं असतं का”, असं रुबीना म्हणाली.

पुढे ती म्हणते, “बॉलिवूडमधील त्या प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्मात्याचं नाव नाही घेणार पण आलेला अनुभव सांगते. ‘तू तो चित्रपट पाहिला आहेस?’, असा प्रश्न मला त्या दिग्दर्शकाने केला होता. त्यावर ‘नाही, मी तो चित्रपट कधीच पाहिला नाही. मी त्यावेळी शाळेत होते आणि एका रुढी-परंपरा धरुन चालणाऱ्या कुटुंबातून मी आहे. त्यामुळे संध्याकाळी ७ नंतर आम्हाला घरी यावं लागायचं. तसंच आम्ही कधीच चित्रपट पाहण्यासाठी घराबाहेर जात नव्हतो’, असं उत्तर मी त्यांना दिलं. त्यावर, ‘खरंच तर तुला माहितच नाहीये मी काय काय केलं आहे ते?’, मला असं वाटतंय तुझ्या तोंडावर फार्ट (वायू उत्सर्जित) करावं’, आणि ते जोरजोरात हसू लागले आणि मी पूर्णपणे स्तब्ध झाले. मला काहीच सुचत नव्हतं. त्यांनी मला खुर्चीवर बसवलं आणि विचारलं, तुला माहित आहे मी काय केलं आहे? तुला माहिती आहे मी कोण आहे? तुला हे तरी माहित आहे का तुला संधी देणारा कोण आहे? त्यावर ‘मला फक्त इकडून बाहेर पडायचं आहे”, इतकंच उत्तर मी दिलं.

दरम्यान, त्यानंतर मी छोट्या पडद्यावरच खूश आहे असं रुबीना म्हणाली. रुबीना छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून ‘छोटी बहू’ आणि ‘शक्ती- अस्तित्व के एहसास की’ यांसारख्या मालिकांमुळे ती घराघरात पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 3:38 pm

Web Title: rubina dilaik shared her horrific experience with a bollywood director ssj 93
Next Stories
1 ‘द व्हाइट टायगर’ : पहिल्यांदाच राजकुमार राव- प्रियांका चोप्रा एकत्र; देसी गर्ल साकारणार ‘ही’ भूमिका
2 ‘मेरे साई’ मालिकेत झळकणार अभिनेत्री शिल्पा तुळसकर
3 कातिलाना अदा! पलक तिवारीच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा
Just Now!
X