27 January 2021

News Flash

Video : गोपी बहु एका नव्या अंदाजात; ‘साथ निभाना साथिया २’चा टीझर प्रदर्शित

'रसोडे मे कौन था' हा प्रश्न आता चांगलाच गाजला आहे.

देवोलिना भट्टाचार्जी

‘रसोडे मे कौन था’ हा प्रश्न आता चांगलाच गाजला आहे. ‘साथ निभाना साथिया’ या प्रसिद्ध मालिकेतील कोकिलाबेनच्या संवादांवरून रचलेला रॅप गेल्या काही दिवसांपासून तुफान व्हायरल होत आहे. या रॅप साँगमुळे मालिकेची जोरदार प्रसिद्धी झाली. याच प्रसिद्धीचा फायदा घेत मालिकेच्या निर्मात्यांनी ‘साथ निभागा साथिया २’ची घोषणा केली आहे. त्याचा टीझरसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

मालिकेत गोपी बहुची भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी या टीझरमध्ये एका नव्या अंदाजात पाहायला मिळतेय. रॅप साँगचाच संदर्भ घेत या टीझरमध्ये कुकरची शिट्टी वाजताना दाखवली आहे. ‘शायद रसोडे मे गेहना ने कुकर गॅस पर चढा दिया होगा’, असं म्हणत गोपी बहु स्वयंपाकघरात जाते. आता ही गेहना कोण आहे हाच प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

आणखी वाचा : ‘चल लग्न करूया..’; जितेंद्र जोशीची पत्नीसाठी खास पोस्ट

ही गेहना कोण आहे याचं उत्तर प्रेक्षकांना मालिकेतच मिळणार आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आम्ही दुसरा सिझन घेऊन येत आहोत, असं मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितलं. या नव्या सिझनमध्ये कोकिलाबेनची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कायम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 10:18 am

Web Title: saath nibhaana saathiya 2 teaser devoleena bhattacharjee returns as gopi bahu on popular demand ssv 92
Next Stories
1 ‘चल लग्न करूया..’; जितेंद्र जोशीची पत्नीसाठी खास पोस्ट
2 ‘बिग बॉस मराठी 2’फेम अभिनेता अभिजीत केळकर करोना पॉझिटिव्ह
3 “आज देशाचं खूप मोठं नुकसान झालं”; प्रणव मुखर्जी यांना रितेश देशमुखने वाहिली श्रद्धांजली
Just Now!
X