छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘साथ निभाया साथिया’ मालिकेतील अभिनेत्री रुचा हसब्निसच्या वडिलांचे निधन झाले आहे. रुचाने स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
रुचाच्या वडिलांचा ८ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. त्यांच्या आठवणीमध्ये तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे. ‘८ ऑगस्ट रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले आहे’ असे रुचाने पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यापूर्वी २ ऑगस्ट रोजी रुचाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये तिने माझ्या वडिलांनी करोनावर मात केली असल्याचे म्हटले होते. मी तुम्हाला विनंती करते की माझे वडिल लवकरता लवकर बरे होऊन घरी येतील यासाठी प्रार्थना करा असे म्हटले होते. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या होत्या.