News Flash

मानसपितापुत्र सचिन- स्वप्नील पुन्हा एकत्र

पहिल्यांदाच पडद्यावर रेखाटणार पिता-पुत्राचे भावबंध

सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी

सचिन पिळगांवकर- स्वप्नील जोशी ही जोडी ऑफस्क्रिन असो वा ऑनस्क्रिन ही जोडी सगळ्यांच्याच आवडीची. मानसपितापुत्रांच्या या जोडीने गेली कित्येक वर्ष रसिक मनांवर अधिराज्य गाजवलं. पडद्यावर यांनी साकारलेल्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. आपल्या वैयक्तिक आयुष्यात सचिन पिळगांवकरांची जागा खास असून ते आपल्याला वडिलांच्या स्थानी असल्याचं म्हणणारा स्वप्नील जोशी तर स्वप्नीलला मुलासारखं वागवणारे सचिन पिळगावकर पितापुत्राचे भावबंध खऱ्या अर्थी जपणारी ही जोडी आता पडद्यावर हे नातं साकारण्यास सज्ज झाली आहे.

२००८ मध्ये आलेल्या आम्ही सातपुते या चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली होती. या चित्रपटातले त्यांचे अनोखं बाँडिंग पाहून प्रेक्षकही सुखावले. त्यानंतर आलेल्या काही गप्पांच्या कार्यक्रमात या जोडीच्या दिलखुलास गप्पांनी या दोघांमधल्या प्रेमळ नात्याची पोचपावती प्रेक्षकांना दिली. आता हीच जोडी तब्बल १० वर्षांनी पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवणार आहे. विशेष म्हणजे मानसपितापुत्राची ही जोडी पडद्यावर पिता-पुत्राच्याच भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट कोणता? या चित्रपटाची कथा काय? पितापुत्राची ही जोडी प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्त्यात असली तरी या जोडीला पडद्यावर एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल, यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 7:32 pm

Web Title: sachin pilgaonkar and swapnil joshi will act in upcoming marathi movie
Next Stories
1 ‘कैसी ये यारिया’ सीझन ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2 ‘मणिकर्णिका’मधील कंगनाचा दुसरा लूक व्हायरल
3 Sacred Games : वेब सीरिजच्या विश्वात सैफचं पदार्पण, फर्स्ट लूक प्रदर्शित
Just Now!
X