News Flash

… आणि जनाई- सारावरच साऱ्यांच्या नजरा!

ती आशाताईंसोबत अनेक गाण्याचे कार्यक्रमही करते

… आणि जनाई- सारावरच साऱ्यांच्या नजरा!

आशा भोसले आणि सचिन तेंडुलकर यांचे तसे जिव्हाळ्याचे नाते. अनेक खासगी कार्यक्रमात त्यांचे कुटुंबिय एकत्र दिसतात. आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिच्या पहिल्या अॅपल स्टोअरच्या उदघाटनावेळी सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली आणि मुलगी सारा यांनी हजेरी लावली होती.

या उद्घाटन सोहळ्यावेळी तेंडुलकर कुटुंबियांशिवाय शंकर महादेवन, जॅकी श्रॉफ, ऋषि कपूर, पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे, तेजस्विनी कोल्हापुरे, सुभाष घई आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक उपस्थित होते. पण तरीही या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण जनाई आणि साराच होते. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या नजरा या दोघांवरच खिळल्या होत्या. संपूर्ण कार्यक्रमामध्ये या दोघी एकत्रच दिसत होत्या.

सारा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात गेली तर प्रसारमाध्यमांची नजर तिच्यावरच असते. सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. पण शेवटी ती अफवाच ठरली. स्वत: सचिनने या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते.  आजही सचिन अनेकांच्या प्रेरणास्थानी आहे. पण, त्याची मुलगी सारा हिला तो प्रेरणास्थानी मानतो. ती नेहमीच आपल्याआधी इतरांचा विचार करते. तिनेच मला दानधर्म करण्याची सवय लावली असं सचिनने एका मुलाखतीत सांगितले होते.

आशा भोसले यांची नात अशी जरी आता जनाईची ओळख असली तरी २०१३ मध्ये आलेल्या आशा भोसले यांच्या ‘माई’ सिनेमातून तिने पार्श्वगायनामध्ये पदार्पण केले होते. ती आशाताईंसोबत अनेक गाण्याचे कार्यक्रमही करते. आपल्या नातीबद्दल बोलताना आशाताई म्हणाल्या की, सध्या माझ्या नातीला यशस्वी पार्श्वगायिका झालेलं पाहणं माझं स्वप्न आहे, असं आशाताई एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 6:02 pm

Web Title: sachin tendulkars daughter sara tendulkar and asha bhosles grand daughter zanai bhosale are at store launch
Next Stories
1 PHOTOS : अंतराळवीर होण्यासाठी सुशांतची तयारी सुरु
2 पैशांच्या मोबदल्यात कोएनाकडे नाईट-आऊटची मागणी, पोलिसांत तक्रार दाखल
3 Secret Superstar new poster: स्वप्नाळू झायरा आणि रॉकस्टार आमिरची झलक
Just Now!
X