वेब विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सीक्वलची घोषणा नेटफ्लिक्सच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात आली होती. या सीक्वलची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता नेटफ्लिक्सने ‘सेक्रेड गेम्स २’चा टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये काटेकर, कुक्कु आणि बंटीची झलक पाहायला मिळत आहे. त्यामुळे सीक्वलमध्ये काटेकर परत येणार असल्याचं दिसतंय.

‘सेक्रेड गेम्स २’च्या एपिसोड्सची नावं ‘बिदल ए गीता’, ‘कथम अस्ति’, ‘अन्तर महावन’ आणि ‘अनागमम्’ अशी आहेत. ही नावं पासून सेक्रेड गेम्सच्या सीक्वलमध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं पाहायला मिळणार हे नक्की. त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय असतो? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सीझनमध्ये मिळण्याची शक्यता आहे. नेटफ्लिक्सने ‘इस बार क्या होगा भगवान भी नहीं जानता’ असं याआधीच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आता कमालीची वाढली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2019 11:17 am