‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूरने नुकतंच साखरपुड्याची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तिर्थदीप रॉयशी ती लग्नगाठ बांधणार असून या दोघांचा साखरपुडा नुकताच पार पडला. तिर्थदीपशी कशी ओळख झाली आणि लग्नाचा निर्णय कसा घेतला याविषयी सईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली, “गेल्या दोन वर्षांपासून मी मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर माझ्या ‘मिस्टर परफेक्ट’ला शोधत होती. तिर्थदीप आणि माझी ओळखसुद्धा मॅट्रिमोनिअल साइटवरूनच झाली आणि ऑगस्टपासून आम्ही बोलू लागलो. काही दिवसांतच आम्हाला एकमेकांचा स्वभाव आवडू लागला आणि एकमेकांविषयी आम्ही फार सकारात्मक होतो. त्यानंतर तो आईला घेऊन बेळगावला मला भेटायला आला. त्या भेटीतच आमचं लग्न ठरलं. खूप घाईत प्रत्येक गोष्ट घडली पण माझ्यासाठी हेच नातं असावं असं मला मनापासून वाटतंय.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिर्थदीपचं राहणीमान अत्यंत साधं असून त्याचा स्वभावसुद्धा सकारात्मक असल्याचं सईने सांगितलं. “मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर मी अनेक मुलांना नाकारलं. जर एखादा मुलगा फोटो पाहूनच आवडला नसेल तर मी त्याचं प्रोफाइलसुद्धा उघडून पाहत नव्हते. पण जेव्हा मी तिर्थदीपचा फोटो पाहिला तेव्हा माझ्यासाठी हाच जोडीदार असावा असं मनापासून वाटलं”, असं ती म्हणाली.