21 September 2020

News Flash

पुन्हा एकदा एकत्र येणार सई आणि जितेंद्र?

सई आणि जितेंद्रने याआधी 'दुनियादारी' या सिनेमातून काम केले

सई ताम्हणकर

बाजी सिनेमाचा लेखक, दिग्दर्शक निखील महाजन आता त्याच्या नव्या सिनेमाच्या तयारीला लागला आहे. पुणे ५२ आणि बाजी या सिनेमांनंतर आता निखील प्रेक्षकांसाठी एक वेगळी कथा घेऊन येणार आहे. त्याने त्याच्या नव्या सिनेमासाठी कलाकारांची जुळवाजुळव करायलाही सुरूवात केली आहे. निखीलच्या या नवीन सिनेमात सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी ही जोडी पाहता येणार आहे. या सिनेमाची घोषणा जरी झाली असली तरी अजून या सिनेमाचे नाव निश्चित झालेले नाही. सई आणि जितेंद्रने याआधी ‘दुनियादारी’ या सिनेमातून काम केले आहे. पण यावेळी ते पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. या सिनेमाचं कथानक काय असेल याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

निखीलने याआधी सई आणि जितेंद्र दोघांसोबतही काम केले आहे. सईने निखीलच्या ‘पुणे ५२’ या सिनेमात काम केलं होतं तर जितेंद्रनेही त्याच्या ‘बाजी’ सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. या दोन्ही कलाकारांसोबत त्यांचं असं खास नातं आहे. त्यामुळे त्याच्या आगामी सिनेमातूनही या दोघांच्या नव्या भूमिका बघायला मिळेल अशा आशा सई- जितेंद्रचे चाहते करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 10:11 pm

Web Title: sai tamhankar and jitendra joshi come together for nikhil mahajans next project
Next Stories
1 हा तर वर्णभेद; दीपिका विदेशी मीडियावर भडकली
2 मनिषा कोईरालाच्या ‘डिअर माया’चा ट्रेलर प्रदर्शित
3 Baahubali 2 box office collection day 7: ‘बाहुबली २’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन बघून तुम्हीही व्हाल चकीत!
Just Now!
X