News Flash

सईचा लक्षवेधी रॅम्पवॉक

दिलखुलास अदांनी सईने उपस्थितांची दाद मिळवली.

सई ताम्हणकर

ग्लॅमर, झगमगाट या गोष्टींसाठी बॉलिवूड प्रसिद्ध आहेच. पण मराठी सिनेसृष्टीतही सध्या ग्लॅमरला जास्त महत्त्व देत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा प्रत्यय विविध कार्यक्रम आणि पार्ट्यांमधून सातत्याने येतच असतो. याशिवाय रॅम्पवॉकवरही या अभिनेत्री आत्मविश्वासाने वावरत असतात. मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याची बहुचर्चित अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकताच रॅम्पवॉक केला.

पुण्यात गोल्ड फिश यांच्या वतीने शोस्टॉपर येथे रॅम्प शो आयोजित केला होता. या शोमध्ये अतिशय दिलखुलास अदांनी सईने रॅम्पवॉक करुन प्रचंड दाद मिळवली.

वाचा : कतरिनासोबत सर्वांत मोठ्या डान्स फिल्ममध्ये झळकणार करणचा ‘स्टुडंट’

‘हे मी अगदी मनापासून करुन त्यातून आनंद मिळवते,’ अशीच यावर सईने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पारंपरिक आणि वेस्टर्न आऊटफीटमध्येही सई नेहमीच आत्मविश्वासाने वावरताना पाहायला मिळते. तिचा हाच अंदाज तरुणाईला सर्वाधिक आवडतो असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 5:53 pm

Web Title: sai tamhankar ramp walk in pune
Next Stories
1 …म्हणून आईच्या निधनानंतर ३ वर्षांनी संजय दत्तच्या भावनांचा बांध फुटला
2 आता चौथं लग्न करायला अँजेलिना जोली सज्ज
3 कतरिनासोबत सर्वांत मोठ्या डान्स फिल्ममध्ये झळकणार करणचा ‘स्टुडंट’
Just Now!
X