31 October 2020

News Flash

सई मांजरेकर आहे सलमानचा ‘जीव’; जाणून घ्या कारण..

महेश मांजरेकर यांची मुलगी सई सध्या सोशल मीडियावर चर्चेत

सलमान खान, सई मांजरेकर

निर्माता-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर आगामी ‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. पहिल्याच चित्रपटात सईला सलमान खानसारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये सई सलमानच्या प्रेयसीची भूमिका साकारतेय. त्यामुळे या जोडीच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची प्रेक्षकांना फार उत्सुकता आहे. शूटिंगदरम्यान सलमान आणि सईमध्ये चांगलीच मैत्री झाली. सईने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सेटवरच्या गमतीजमती सांगितल्या आहेत.

सलमानसोबत शूटिंग करताना कम्फर्टेबल होती असं सईने सांगितलं. ‘दबंग ३’मध्ये सईसोबतच तिची आई व बाबा या दोघांचीही भूमिका आहे. सईची आई जेव्हा सेटवर असायची तेव्हा तिला ‘जीव’ या नावाने हाक मारायचे. कारण सईला घरी जीव अशीच हाक मारतात. त्यामुळे सलमानसुद्धा सईला त्याच नावाने हाक मारायचा असं तिने सांगितलं.

पाहा फोटो : बोल्डनेसच्या बाबतीत आमिरच्या मुलीने टाकलं बॉलिवूड अभिनेत्रींना मागे

‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये सलमान, सई व सोनाक्षीची मुख्य भूमिका आहे. यासोबतच दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपसुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 3:03 pm

Web Title: saiee manjrekar salman khan dabangg 3 ssv 92
Next Stories
1 १९७६ मध्ये ‘मिस इंडिया’ खिताब पटकावणाऱ्या अभिनेत्रीला पाहून व्हाल थक्क!
2 ‘उरी’फेम विकी कौशल म्हणतो… “देशात जे चाललंय ते योग्य नाही”
3 टॉम क्रुजच्या बाइकची विमानाशी ‘रेस’, ३४ वर्षांनंतर येतोय ‘हा’ चित्रपट
Just Now!
X