News Flash

सैफ अली खानच्या ‘तांडव’ सीरिजचा टीझर प्रदर्शित

ही सीरिज १५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची आगामी सीरिज ‘तांडव’ लवकच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज अॅमोझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘तांडव’ वेब सीरिज ही राजकारणावर आधारित असून अली अब्बास जफरने निर्मिती केली आहे. नुकताच या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

‘तांडव’ या वेब सीरिजचा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या एक मिनिटाच्या टीझरमध्ये सैफ अली खान हा एका राजकीय नेत्याची भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे. सैफचा हा हटके अंदाज पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची असणार आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार दिसणार आहेत.

या सीरिजच्या माध्यामातून अली अब्बास जफर यांच्या सोबतच डिंपल कपाडिया डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहेत. तसेच या सीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खान, झीशान अय्यूब आणि सुनील ग्रोव्हर एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. ‘तांडव’ ही वेब सीरिज १५ जानेवारी २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 3:14 pm

Web Title: saif ali khan political drama tandav teaser out avb 95
Next Stories
1 ‘मधु इथे, चंद्र…’; स्वप्नीलसाठी पत्नीने शेअर केली खास पोस्ट
2 सई- आदित्यची जोडी चाहत्यांमध्ये हिट; पण विराजस म्हणतो…
3 रामायणातील लक्ष्मणाने सेटवर केला होता मजेशीर प्रँक; फोटो पोस्ट करत सांगितली आठवण
Just Now!
X