News Flash

‘…म्हणून मी मास्क लावला नव्हता’; ट्रोलिंगनंतर सैफने सोडलं मौन

सैफने सांगितलं मास्क न लावण्यामागचं खरं कारण

मार्च महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या अटी आता शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विस्कळत झालेलं जनजीवन पुन्हा सुरळीत होताना दिसत आहे. यातच काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खान पत्नी करीना कपूर खान आणि लेक तैमूरसोबत मरीन ड्रायव्ह परिसरात दिसला होता. यावेळी सैफने चेहऱ्यावर मास्क न लावल्यामुळे त्याच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली होती. परंतु, आता या ट्रोलिंगवर सैफने मौन सोडलं असून त्यावेळी चेहऱ्यावर मास्क का नव्हता यामागचं कारण सांगितलं आहे. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

“लॉकडाउनच्या अटी शिथील झाल्यानंतर आम्ही घराच्या बाहेर पडलो होतो. सलग तीन महिने तैमुरदेखील घरीच होता त्यामुळे आमच्यासोबत आम्ही त्यालादेखील फिरायला घेऊन गेलो होतो. खरं तर आमच्या तिघांजवळ मास्क होते. परंतु, त्यावेळी फिरत असताना आमच्या आसपास कोणी नव्हतं म्हणून मी तो मास्क काढून ठेवला होता”, असं सैफ म्हणाला.

पुढे तो म्हणतो, ”जसं आमच्या लक्षात आलं की समोरुन काही लोक येत आहेत आणि त्या ठिकाणी लहान मुलांना नेण्याची परवानगी नाही. त्याच क्षणी आम्ही चेहऱ्यावर मास्क लावले आणि परत घरी परतलो. परंतु, हे सत्य त्यावेळी कोणीच सांगितलं नाही. आम्ही जबाबदार आणि कायदेशीर नियमांचं पालन करणारे नागरिक आहोत. लॉकडाउनच्या काळात आम्ही घरीच होतो.आतादेखील आम्ही फक्त आणि फक्त आमच्या कुटुंबीयांसोबतच वेळ घालवत आहोत”.

दरम्यान, सध्या करोना विषाणूने देशात थैमान घातलं आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना आतापर्यंत करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. यातच बिग बींनादेखील करोनाची लागण झाली आहे. इतकंच नाही तर सारा अली खानच्या कारचालक, रेखा यांचे सुरक्षारक्षक, अनुपम खेर यांच्या घरातील सदस्य यासारख्या कलाविश्वाशी निगडीत अनेकांना करोनाची लागण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 1:18 pm

Web Title: saif ali khan reveals truth of kareena taimur and him not wearing masks during marine drive outing ssj 93
Next Stories
1 आणखी एक मराठी अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश
2 ‘आता घरी परतण्याची वेळ आली’; किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोनू सूदचं आश्वासन
3 “ही बाई आता काहीही बरळतेय”; अनुराग कश्यपने साधला कंगनावर निशाणा
Just Now!
X