29 October 2020

News Flash

पहिल्या पत्नीबाबत सैफने केला मोठा खुलासा

सैफने एका मुलाखतीदरम्यान हा खुलासा केला आहे

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने उत्तम अभिनय शैलीमुळे कलाविश्वामध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. गंभीर, विनोदी अशा एक ना अनेक भूमिका त्याने साकारल्या असून त्याच्या याच भूमिकांमुळे त्याने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी छाप उमटवली आहे. सैफ नेहमी त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलणे टाळतो. परंतु नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सैफने त्याची पहिली पत्नी अमृता सिंहबाबत मोठा खुलासा केला आहे.

‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सैफने त्याची पहिली पत्नी अमृता सिंहने करिअरच्या बाबतीत मदत केली असल्याचे म्हटले आहे. ‘मी २० वर्षांचा असताना घरातून पळून जाऊन लग्न केले. मला माझे काम आणि व्यवसाय गांभीर्याने घेण्यास माझी पूर्वपत्नी अमृताने शिकवले. तिने माझा आत्मविश्वास वाढवण्यासही मदत केली. मला दिल चाहता है या चित्रपटातील व्यक्तिरेखेकडे कसे पाहावे हे समजत नव्हते. मात्र अमृताने मला मदत केली आणि माझा आत्मविश्वास वाढवला’ असे सैफ म्हणाला.

आणखी वाचा : ‘बाहुबली २’ चित्रपटासाठी अनुष्काने घेतले होते इतके मानधन

अमृता आणि सैफची ‘बेखुदी’ चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली होती. या चित्रपटातून सैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होता. अमृता आणि सैफने घरचांच्या विरोधात जाऊन १९९१ मध्ये लग्न केले. पण त्यानंतर फार काळ त्यांचा संसार टिकला नाही. अखेर २००४ मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. त्यानंतर सैफ २०१२ मध्ये अभिनेत्री करिना कपूरसह विवाहबंधनात अडकला. करिना सैफ पेक्षा १० वर्षांनी लहान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 4:09 pm

Web Title: saif ali khan talks about ex wife amrita singh in interview avb 95
Next Stories
1 ५० व्या ‘इफ्फी’मध्ये स्मिता तांबेच्या या चित्रपटाची वर्णी
2 Photo : ‘कुछ कुछ होता है’मधील छोटी अंजली पाहा आता कशी दिसते
3 दीपिकाच्या बॅगची किंमत जाणून तुम्हीही म्हणाल, अरे बापरे!
Just Now!
X