सोहा अली खान लिखित ‘द पेरिल्स ऑफ बिइंग मॉडरेटली फेमस’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी सोहासह संपूर्ण खान कुटुंब उपस्थित होते. सैफला आपल्या बहिणीबद्दल खास गोष्ट सांगायला सांगितले, तेव्हा त्याने तिच्याशी निगडीत एक भन्नाट किस्सा सांगितला.

सैफ म्हणाला की, ‘कुणाल तिच्या आयुष्यात येण्यापूर्वी सोहा एका मुलाला भेटायला गेली होती. ते दोघं एकमेकांशी गप्पा मारत असताना सोहाला तिच्या मित्राने मेसेज करुन सारे काही ठीक चालले आहे ना? असा प्रश्न विचारला. सोहाला तो मुलगा फारसा आवडला नव्हता, म्हणून तिने तो खूप कंटाळवाणा आहे असे उत्तर दिले. पण चुकून तिने हा मेसेज समोर बसलेल्या त्या व्यक्तिलाच पाठवला. एवढं करुन ती थांबली नाही तर तिने त्याच्याकडून फोन मागितला. त्याच्या मोबाइलमधून तिने पाठवलेला मेसेज डिलीट केला आणि नंतर त्याला त्याचा मोबाइल परत केला, अशी आहे माझी बहीण सोहा.’

आपल्या पुस्तकाबद्दल बोलताना सोहा म्हणाली की, एकदा प्रकाशक मला भेटायला आले आणि जर मी त्यांच्यासाठी पुस्तक लिहिलं तर ते प्रकाशित करतील असे म्हणाले. पण पुस्तक वाचण्यात आणि ते लिहिण्यात खूप अंतर असतं. त्यामुळेच मी सुरूवातीला छोटा भाग लिहिण्याचे ठरवले. वाचकांना हे पुस्तक आवडलं तर मी पुढेही लिहिणं सुरूच ठेवेन.

https://www.instagram.com/p/BcohQh0Hcmq/