‘सैराट’ चित्रपटाला या महिन्यात एक वर्ष पूर्ण होतयं. तब्बल एका वर्षानंतरही प्रेक्षकांना या चित्रपटाने लावलेलं याडं किचिंतही कमी झालेलं नाही. प्रेक्षकांना हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाल्यासारखे वाटते, अगदी अशीच भावना चित्रपटातील कलाकारांमध्येही आहे. चित्रपटातील आर्चीची मैत्रीण आनी अर्थात अनुजा मुळ्ये ही देखील याला अपवाद नाही. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आनीने ‘सैराट’च्या आठवणींना उजाळा दिला. ‘सैराट’च्या चर्चा पाहता या चित्रपटाला वर्ष झाले, असे अजिबात वाटत नसल्याचे ती म्हणाली. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटातील आर्ची (रिंकू राजगुरु) आणि परश्या (आकाश ठोसर) यांनी ज्याप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात घर केले, अगदी त्याच प्रमाणे आनीच्या अभिनयालाही (अनुजा मुळ्ये) प्रेक्षकांनी दाद दिली.

sairat-anuja-and-rinku-rajguru

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

#SairatMania : गोष्ट नागराज नावाच्या ब्रॅण्डची!

आनी अर्थात अनुजा मुळये ही मुळची पुण्याची. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात वाढलेल्या अनुजाला रंगमंचाची चांगलीच ओढ. त्यामुळेच ती कायद्याचे शिक्षण घेत मिळेल तेव्हा रंगमंचावरुन आपल्यातील अभिनयाचा बाज दाखवून देते. अनुजाने महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या ‘पुरुषोत्तम करंडक’ तसेच ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धा गाजविल्या आहेत. ‘सैराट’ चित्रपटातील तिची निवडही रंगमंचावरुनच झाली. ‘लोकसत्ता’ने आयोजित ‘लोकांकिका’ स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक  नागराज मंजुळे आले होते. त्यावेळी एका एकांकिकेमध्ये अनुजा मुळ्येही भूमिका करत होती. त्याचवेळी नागराज यांनी तिला हेरले आणि ती आर्चीची मैत्रीण झाली.

‘सैराट’ने कलाकारांना एक ओळख दिली यात नवं नाही. पण या चित्रपटाने प्रेक्षकांना जसा आनंद दिला, अगदी त्याच प्रमाणे कलाकारांनाही अविस्मरणीय अनुभव दिला. या चित्रपटाचा अनुभव सांगताना अनुजा म्हणाली, “या चित्रपटामुळे ग्रामीण जीवन जगण्याची संधी मला मिळाली. शेतातील चित्रीकरण, ट्रॅक्टरवर बसण्याची पहिलीच वेळ, घोड्यावरील सैर आणि विहिरीत पोहण्याचा किस्सा अविस्मरणीय असा आहे. चित्रपटाच्या निमित्ताने गावाकडे केलेली भटकंती ही चौपाटीवरच्या भटकंतीपेक्षा खूपच भन्नाट होती.”

#SairatMania : महाराष्ट्रातनं थेट कर्नाटकात… ते बी एकटीच!

anuja-muley

प्रेक्षक म्हणून ‘सैराट’ चित्रपटातील आवडता सीन सांगताना पहिल्या भागातील कथानक अधिक आवडल्याचे अनुजाने म्हणते. चित्रपटातील पहिला भाग प्रेमकथेमुळे नव्हे, तर नायिकेच्या निर्भीडपणामुळे आवडल्याचे सांगायला अनुजा विसरत नाही. आर्चीच्या व्यक्तिरेखेविषयीचा दाखला देताना अनुजा म्हणाली की, “सर्वच मुलींमध्ये आर्ची असते, पण त्या आपल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करायला घाबरतात. त्यामुळे चित्रपटातील आर्चीभोवती गुंफलेले प्रत्येक धाडसीदृश्य आकर्षित करणारेच आहे.

sairat-1

#SairatMania : अन् ‘उबर’चा मेसेज आला ‘मंग्या ऑन द वे….’

‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरु कन्नड चित्रपटसृष्टीत गेली. परश्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला. मग, अभिनयाचा छंद जोपासणारी आनी अर्थात अनुजा पडद्यावर दिसणार नाही म्हणजे नवलच होईल. ‘सैराट’ च्या यशानंतर अनुजालाही अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. मात्र, कायद्याचा अभ्यास अधिक फायद्याचा असल्याचे जाणून ती पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करते आहे. त्यातूनही सुट्टीच्या वेळेत तिने एक चित्रपट साकारला आहे.  ‘सैराट’च्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर अनुजाने आगामी चित्रपटात दिसणार असल्याचे संकेतही दिले. चित्रपटाच्या नावाबद्दल गोपनीयता बाळगत ‘सैराट’ चित्रपटापेक्षा वेगळ्या भूमिका साकारणार असल्याचे ती म्हणाली. आर्चीची मैत्रीण आनी दिग्दर्शक समीर आठल्ये यांच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्रामीण कथानक असणाऱ्या या चित्रपटात ती वयापेक्षा मोठी भूमिका साकारताना दिसेल. ‘सैराट’ चित्रपटातून माझ्याशी जोडला गेलेला प्रेक्षक नव्या लूकमध्ये मला ओळखू शकणार नाही, असे सांगत तिने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवली आहे.

#SairatMainia तुम्हाला कसा वाटतोय… तुमच्या काय आठवणी आहेत… ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा… loksatta.express@gmail.com  या ईमेल आयडीवर….

-सुशांत जाधव sushant.jadhav@indianexpress.com