माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता १२ वीची परीक्षा गुरुवार २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू ही यंदा बारावीची परीक्षा देणार आहे. रिंकू ही टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून ही परीक्षा देणार आहे. तिला पाहण्यासाठी कायमच गर्दी होते, मात्र परीक्षेदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून महाविद्यालयाने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री गवळी सातपुते यांनी एक पत्र लिहीत टेंभूर्णी पोलीस ठाण्याकडे ही मागणी केली आहे.

रिंकू नियमित कॉलेजला जात नसल्याने ती बहिःस्थ विद्यार्थी म्हणून १२ वीची परीक्षा देणार आहे. तिने कला शाखेला प्रवेश घेतला असून मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असे तिचे विषय असतील. सैराट चित्रपटानंतर तिने दहावीची परीक्षा दिली होती. त्यावेळी तिने सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधील जिजामाता कन्या प्रशालेच्या केंद्रातून ही परीक्षा दिली होती. अद्याप पोलिसांनी या बंदोबस्ताबाबत शाळेला काहीही कळवले नसून शाळा पोलिसांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण ९६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असून ५३ हजार १५६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कॉपी व अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तर परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने राज्यभरात २५२ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पर्यवेक्षकांसाठी मोबाईल बंदी असून, शिक्षकांनी मोबाईल केंद्र संचालकांकडे जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.