News Flash

‘काही हात सापडले, काही निसटले’; वडील मोहन गोखलेंसाठी सखीची भावूक पोस्ट

सखीला शाळेत सोडतानाचा मोहन व शुभांगी गोखलेंचा 'तो' खास फोटो

सखी गोखले व तिचे वडील दिवंगत अभिनेते मोहन गोखले

काही आठवणी चेहऱ्यावर हसू उमटवतात तर काही डोळ्यांत पाणी आणतात. काही आठवणी आपण मनाच्या कोपऱ्यात खूप जपून ठेवतो. कारण त्या आठवणींशी निगडीत असलेली व्यक्ती आपल्या खूप जवळची असते. अशीच एक जुनी आठवण अभिनेत्री सखी गोखलेने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सखीने तिचा शाळेत जातानाच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तिच्यासोबत आई शुभांगी गोखले व वडील मोहन गोखलेसुद्धा पाहायला मिळत आहेत. त्या जुन्या आठवणींना उजाळा देत सखीने भावूक पोस्ट लिहिली आहे.

‘ही जागा… माझ्या शाळेची बस मला या ठिकाणाहून न्यायला आणि सोडायला यायची. मला निरोप देणारे आणि हसऱ्या चेहऱ्याने माझी वाट पाहणारे हात मी या ठिकाणी धरले. काही हात कोमल होते, तर काही कणखर, काही हातांना हाती घेताना माझे छोटे हात त्यात दिसेनासे व्हायचे, काहींच्या मिठीत मी असायचे. काही हात निसटले, तर काही सापडले’, अशी भावनिक पोस्ट सखीने लिहिली. आपल्या चिमुकल्या मुलीला शाळेत सोडताना आईवडिलांची जी गडबड, धडपड सुरू असते, तीच या फोटोत पाहायला मिळतेय.

‘मिस्टर योगी’ मालिकेपासून घराघरांत पोहोचलेल्या मोहन गोखलेंनी ‘हिरो हिरालाल’,’ मोहन जोशी हाजीर हो’ यांसारख्या अनेक सिनेमांत अजरामर भूमिका केल्या. मात्र, वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. सखी गोखले ही मोहन गोखले व शुभांगी गोखले यांची कन्या आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 10:11 am

Web Title: sakhee gokhale gets emotional as she shares a throwback picture with late father mohan gokhale ssv 92
Next Stories
1 ‘श्रीगणेश’ फेम अभिनेते जगेश मुकाटी काळाच्या पडद्याआड
2 करोना रुग्ण आढळल्यानंतर मलायका अरोराची इमारत सील
3 चित्र रंजन : वाईटातून चांगल्याची अनुभूती..!
Just Now!
X