मुंबई पोलिसांच्या जीवनावर आधारित एक नवा कार्यक्रम अभिनेता सलमान खान तयार करणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने तो निर्मात्याच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘गर्व: प्राईड अ‍ॅण्ड ऑनर’ आणि ‘दबंग’ या चित्रपटांत सलमान पोलिसांच्या भूमिकेत दिसला होता.व्यक्तिगत आयुष्यातील अनेक समस्यांचा सामना करीत पोलीस लोकांच्या संरक्षणाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे या पोलिसांचे आयुष्य मालिकेद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा सलमान खान याचा प्रयत्न आहे.  सलमान सध्या ‘दस का दम’ या रिअ‍ॅलिटी शोच्या चित्रीकरणणात व्यग्र आहे. त्यानंतर या मालिकेकडे तो वळणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.