News Flash

सलमानने कतरिनाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; फोटो होतोय व्हायरल…

सलमान खानने पोस्ट केलेला 'तो' फोटो होतोय व्हायरल...

सलमानने कतरिनाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; फोटो होतोय व्हायरल…

कतरिना कैफ बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मादक अंदाज आणि मनमोहक हास्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या कतरिनाचा आज वाढदिवस आहे. आज कतरिना ३७ वर्षांची झाली. या निमित्ताने अभिनेता सलमान खानने दिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानची ही अनोखी पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “केलेल्या पापांची याच जन्मात फळं भोगावी लागतील”; अभिनेत्याने केली सलमानवर टीका

सलमानने इन्स्टाग्रामवर कतरिनासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. “कतरिना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” अशी कॉमेंट त्याने या फोटोवर लिहिली आहे. सलमान आणि कतरिना कधीकाळी एकमेकांना डेट करत होते. दोघं लग्न देखील करणार अशा चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर सलमानने पोस्ट केलेला हा फोटो सध्या चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – बहिणीला वाचवताना त्याला ९० टाके पडले; सुपरहिरोंनीही केला ६ वर्षांच्या हिरोला सलाम

 

View this post on Instagram

 

Happy bday Katrina . . @katrinakaif

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कतरिना मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावत होती. त्यासोबतच तिने अनेक तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं होतं. विशेष म्हणजे लंडनमधील एका शो दरम्यान दिग्दर्शक कैझाद गुस्ताद यांनी कतरिनाला पाहिलं आणि तेथेच त्यांनी तिला ‘बूम’ या चित्रटाची ऑफर दिली. खरंतर कतरिनासाठी ही फार मोठी संधी होती, मात्र २००३ साली प्रदर्शित झालेला ‘बूम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही गाजला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 6:44 pm

Web Title: salman khan birthday wishes to katrina kaif mppg 94
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांचं विठोबा-रखुमाईला साकडं; म्हणाले
2 सारा अली खानने शेअर केला सैफ अली खानसोबतचा फोटो, म्हणाली…
3 “आता लाजही वाटत नाही”; तो व्हिडीओ पाहून अभिनेत्याची पोलिसांवर टीका
Just Now!
X